Geert Wilders & Nupur Sharma Dainik Gomantak
देश

नुपूर शर्मांच्या वतीने नेदरलँडचे खासदार मैदानात, ''काही चुकीचं बोलल्या नाहीत''

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद सुरुच आहे.

दैनिक गोमन्तक

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद सुरुच आहे. दरम्यान, नेदरलँड्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य आणि पार्टी फॉर फ्रीडम, नेदरलँडचे अध्यक्ष गीर्ट वाइल्डर्स यांनी नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. खासदार गीर्ट वाइल्डर्स यांचे वक्तव्य चर्चेत आहे. भारताने इस्लामिक देशांची माफी मागण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. (appeasement never works says netherlands lawmaker geert wilders comes out in support of nupur sharma)

भारत माफी का मागतोय?

एका ट्विटमध्ये गीर्ट वाइल्डर्स म्हणाले की, ''तुष्टीकरण कधीही काम करत नाही. हे फक्त गोष्टी खराब करते. तेव्हा माझ्या भारतातील प्रिय मित्रांनो, इस्लामिक देशांना घाबरु नका. स्वातंत्र्यासाठी उभे राहा. अभिमान बाळगा आणि प्रेषितांबद्दल सत्य बोलणाऱ्या तुमच्या नेत्या नुपूर शर्मांचे रक्षण करण्याचा निर्धार करा.''

त्यांनी पुढे म्हटले आहे की, 'प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल खरे बोलल्यामुळे अरब आणि इस्लामिक देश भारतीय नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्यावर नाराज आहेत, जे हास्यास्पद आहे.'

गीर्ट वाइल्डर्सला जीवे मारण्याची धमकी?

खासदार गीर्ट वाइल्डर्स हे उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे नेते आहेत. आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. रोज मला मोहम्मद यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धमक्या देऊन काही होणार नाही कारण मी सत्य बोलणे थांबवणार नाही.

भाजपने नुपूरची हकालपट्टी केली

नुपूर शर्मा यांनी इस्लाम आणि पैगंबर यांच्याबद्दल टीव्ही शो दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर भाजपने (BJP) त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. भाजपने दिल्ली (Delhi) भाजपचे प्रवक्ते नवीन कुमार जिंदाल यांचीही हकालपट्टी केली आहे. आखाती देशांच्या विरोधानंतर भाजपने हे पाऊल उचलले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT