temple Dainik Gomantak
देश

'हिंदू धर्म रक्षा'साठी आंध्र प्रदेशात बांधली जाणार 3 हजार मंदिरे

आंध्र प्रदेशच्या जगन मोहन सरकारने राज्यात ३ हजार हिंदू मंदिरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आंध्र प्रदेशच्या जगन मोहन सरकारने राज्यात 3 हजार हिंदू मंदिरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यात मंदिरे बांधण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. 

तीर्थक्षेत्रांचा विकास केला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी माहिती दिली की सीएम रेड्डी यांनी हा निर्णय हिंदू धर्माचे रक्षण आणि प्रचार करण्यासाठी घेतला आहे. सत्यनारायण म्हणाले, मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी सरकारने दुर्बल घटकांच्या भागात मंदिरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

मंदिरांच्या बांधकामासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानच्या श्री वाणी ट्रस्टच्या वतीने प्रत्येक मंदिराच्या बांधकामासाठी 10 लाख रुपये खर्च केले जाणार आहे. यापूर्वी राज्यात 1330 मंदिरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आता या यादीत आणखी 1465 मंदिरांचा समावेश झाला आहे. याशिवाय काही आमदारांच्या मागणीनुसार आणखी 200 मंदिरे बांधली जाणार आहेत. उर्वरित मंदिरे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बांधण्यात येणार आहेत. सध्या संपूर्ण राज्यात 978  मंदिरांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: भाजपचा शिस्तीचा बडगा कोसळला!

Agniveer Job News: अग्निवीरांसाठी मोदी सरकारचा मोठा दिलासा! 4 वर्षांचा कार्यकाळ संपताच हातात असणार दुसरी सरकारी नोकरी; काय आहे नेमका प्लॅन?

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक कोंडीचा गुंता सुटणार? रविवारी तज्ज्ञांची पाहणी; सोमवारी संयुक्त बैठकीत मोठा निर्णय

Horoscope 18 September 2026: शुक्रवारचा ग्रहांचा महासंयोग! 5 राशींना होणार अफाट आर्थिक फायदा; रखडलेली कामे चुटकीसरशी मार्गी लागणार

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

SCROLL FOR NEXT