Home Minister Amit Shah  Dainik Gomantak
देश

Amit Shah: अमित शहांची नितीश कुमारांवर जहरी टीका, म्हणाले आयाराम-गयाराम...

Amit Shah: बिहारमध्ये कायदाव्यवस्था बिघडली आहे.

दैनिक गोमन्तक

Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या बिहारमध्ये आहेत. पश्चिम चंपारणमध्ये आयोजित रॅलीमध्ये अमित शहांनी नितिश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बिहारमध्ये कायदाव्यवस्था बिघडली आहे.

नकली दारुमुळे लोक मरत आहेत मात्र नीतीश कुमारांना दर तीन वर्षानंतर पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडते. जंगलराज असणाऱ्यासोबत ते व्यवहार करतात. नितीश कुमारांचे नेहमीच या पक्षातून त्या पक्षात येणेजाणे सुरु असते.

आयाराम गयाराम सारखे नितीश कुमारांचे काम सुरु आहे. आता नितीश कुमारांसाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद आहेत. बिहारमध्ये हत्या ,अपहरण ,खूनासारखे गुन्हे राजरोसपणे सुरु आहेत. पीएफआय सारखी संघटना बिहारला आपलं मुख्यालय बनवू पाहत होती आणि तरीदेखील नीतीश बाबू गप्प बसले होते.

मोदींनी पीएफआयवर बंदी घालून देशाचे भले केले आहे असेदेखील अमित शहांनी म्हटले आहे. याबरोबरच, नीतीश कुमारांची संधी बघून पंतप्रधान बनण्याची इच्छा जागी होते. त्यांच्या अस्थिर वागण्यामुळे बिहार( Bihar )चे नुकसान होत असल्याची टिप्पणी देखील अमित शहांनी म्हटले आहे.

आता अमित शहांच्या या जोरदार टिकेवर नीतीश कुमार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT