Ambedkar Jayanti 2023 Dainik Gomantak
देश

President on Ambedkar Jayanti 2023: बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी केलं अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अनेक राजकिय नेत्यांनी अभिवादन केले आहे.

Puja Bonkile

President on Ambedkar Jayanti 2023: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी म्हणजेच आज भारतासह जगभरात साजरी केली जात आहे. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे.

महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत आजच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन 'ज्ञान दिन' म्हणून साजरा करतात. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती आहे.  राष्ट्रपती मुर्मु, पतंप्रधान मोदींसह अनेक राजकीय नेत्यांनी अभिवादन केले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत अभिवादन केले आहे.

पतंप्रधान मोदींनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत अभिवादन केले आहे.

बहुजन समाजवादी पार्टीच्या मायावती यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लखनऊ येथे अभिवादन केले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेंगळुरू येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचे नेतृत्व करणारे प्रमुख योद्धे, अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित अशा बहुआयामी ओळख असणारे डॉ. भीमराम रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिन. अस्पृश्यता पाळली जात असताना, सामाजिक विषमतेला तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकारही म्हटले जाते. 

4 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली. जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांच्या अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते. तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. भारतात, 14 एप्रिल ही दरवर्षी अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते.

आंबेडकर राज्यसभेतून दोनदा खासदार म्हणून निवडून आले. डॉ भीमराव आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. 1990 मध्ये बाबासाहेबांना भारतरत्न  पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT