Terrorists Dainik Gomantak
देश

Amarnath Yatra 2023: अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, काश्मीरमध्ये पहिल्यांदाच सापडला 'हा' धोकादायक बॉम्ब

Amarnath Yatra 2023: अमरनाथ यात्रेबाबत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दले सतर्क आहेत. कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

Manish Jadhav

Amarnath Yatra 2023: अमरनाथ यात्रेबाबत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दले सतर्क आहेत. कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. दुसरीकडे, दहशतवादीही त्यांचे नापाक मनसुबे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

या क्रमाने, पोलिसांनी श्रीनगरमध्ये परफ्यूम आयईडी जप्त केला आणि एक मोठा दहशतवादी कट हाणून पाडला.

दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमध्ये (Srinagar) लष्कराच्या दहशतवादी साथीदाराकडून परफ्यूम आयईडी बॉम्ब जप्त करुन दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. या घटनेनंतर अमरनाथ यात्रेची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे.

लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी सहकारी यासिर अहमद इटू याला श्रीनगरच्या बाटमालू बसस्थानकात चार परफ्यूम बॉम्ब घेऊन जाताना पकडण्यात आले. काश्मीरमधून असे बॉम्ब सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे, तीही उन्हाळी राजधानी श्रीनगरमधून.

पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, गुलशनाबाद, कैमोह येथील रहिवासी असलेल्या यासिर अहमद इटू या लष्कराचा दहशतवादी सहकारी याला बटमालू बसस्थानकावरुन 4 परफ्यूम आयईडीसह अटक करण्यात आली.

काश्मीरमधून परफ्यूम बॉम्ब सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे, तीही शहरातून, त्यामुळे गोष्टी हलक्यात घेता येणार नाहीत. मात्र, यात्रेमुळे खोऱ्यातील सुरक्षा दल सतर्क आहेत. आता यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यात येत आहे.

तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये परफ्यूम बॉम्बची ही दुसरी जप्ती आहे. यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीर पोलिसांनी जम्मूमधील एका शाळेतून परफ्यूम बॉम्ब जप्त केला होता.

त्यावेळी, जम्मूच्या नरवाल भागात 21 जानेवारी रोजी झालेल्या दुहेरी स्फोटाचा तपास करत असताना पोलिसांनी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आरिफला अटक केली होती, ज्यामध्ये नऊ जण जखमी झाले होते.

दुसरीकडे, मे 2022 मध्ये भक्तांना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आरिफने स्वीकारल्याचा दावा पोलिसांनी (Police) केला होता. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, एक उच्चस्तरीय पथक श्रीनगर भागात जप्तीची चौकशी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT