Akhilesh Yadav and Azam Khan have resigned from the Lok Sabha Dainik Gomantak
देश

अखिलेश यादव अन् आझम खान यांनी खासदारकीचा दिला राजीनामा

अखिलेश यादव आणि आझम खान यांनी लोकसभेचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबतच सपाचे नेते आणि माजी मंत्री आझम खान यांनीही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी भाग घेतला होता. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून तर आझम खान रामपूरमधून आमदार झाले. (Akhilesh Yadav and Azam Khan have resigned from the Lok Sabha)

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी करहल मतदारसंघातून डॉ.एसपी सिंह बघेल यांचा पराभव केला होता. निवडणुकीच्या निकालात भाजपला (BJP) बहुमत मिळाले असून, सपाही 100 जागांचा टप्पा ओलांडून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.

किंबहुना विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच अखिलेश यादव आमदारकी सोडणार की, लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र आज लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अखिलेश यादव सोशल मीडियावरुनही भाजपवर निशाणा साधत आहेत. भाजपच्या राजवटीत लोकशाहीचे रक्षण करण्याची अपेक्षा करणे म्हणजे दिवसा तारे शोधण्यासारखे आहे, असे ट्विट करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT