Asaduddin Owaisi Dainik Gomantak
देश

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उतरणार AIMIMचे 100 उमेदवार

बसपा (BSP) आणि ओवेसी (Owaisi) यांचा पक्ष एमआयएम (AIMIM) यांच्यात युती झाल्याच्या बातम्यांची चर्चा प्रसार माध्यमांत सुरू होत्या.

दैनिक गोमन्तक

पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुका (Assembly Elections) पार पडणार असुन निवडणुकांच्या अनुशंगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत असदु ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडीया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) देखील निवडणूक रिंगणात उतरणार आहे. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा केली. असुन, 100 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. यावरुन पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर ओवेसी यांचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओवेसी यांनी रविवारी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात मला तुमच्यासमोर काही गोष्टी मांडायच्या आहेत - आम्ही निर्णय घेतला आहे की, आम्ही 100 जागांवर आपले उमेदवार उभे करू, पक्षाने उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली असुन आम्ही उमेदवारांचा अर्जही जाहीर केले आहे. "
ते पुढे म्हणाले, "आम्ही सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर साहेब यांच्या 'भागीदारी संकल्प मोर्चा’ सोबत आहोत. निवडणुका किंवा युतीसंदर्भात अन्य कोणत्याही पक्षाशी आमची चर्चा झाली नाही."

दरम्यान, ओम प्रकाश राजभर यांनी 'भागीदारी संकल्प मोर्चा' स्थापन केला असून त्यामध्ये ते छोट्या पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यापुर्वी रविवारी सकाळी बसपा अध्यक्ष मायावती यांनी बीएसपी आणि ओवेसी यांचा पक्ष एमआयएम यांच्यात युती झाल्याच्या बातम्यांची चर्चा प्रसार माध्यमांत सुरू होत्या. यावर बोलताना ते म्हणाले की, “कालपासून एका वृत्तवाहिनीमध्ये बातम्या प्रसारित केल्या जात आहेत की ओवैसी यांचा पक्ष एआयएमआयएम आणि बसपा एकत्रितपणे यूपीमधील आगामी विधानसभा निवडणुका लढवतील. ही बातमी पूर्णपणे खोटी, दिशाभूल करणारी आणि तथ्यहीन आहे. यामध्ये सत्यतेचा एक शब्दही नाही आणि बसपाने याला तीव्रपणे नकार दिला."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT