AIMIM chief Asaduddin Owaisi warns Prime minister Narendra Modi On NPR,NCR
AIMIM chief Asaduddin Owaisi warns Prime minister Narendra Modi On NPR,NCR  Dainik Gomantak
देश

NCR,NPR वरून असदुद्दीन ओवेसींचा मोदींना पुन्हा 'शाहीनबाग' चा इशारा

दैनिक गोमन्तक

सरकारने जर एनपीआर (NPR) आणि एनआरसी (NCR) कायदे आणले तर आम्ही आणखी एक नवीन 'शाहीनबाग' (Shaheen Bagh) तयार करू, असा इशारा एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी दिला आहे .याआधी दिल्लीतील शाहीन बाग येथे सीएए (CAA) विरोधात दीर्घकाळ निदर्शने करण्यात आली होती, त्याठिकाणी हजारो लोक आंदोलनाला बसले होते, ज्यांनी देशात कोरोनाची परिस्थिती उद्भवल्यानंतर माघार घेतली.(AIMIM chief Asaduddin Owaisi warns Prime minister Narendra Modi On NPR,NCR)

अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवेसींनी आणखी एक शाहीन बाग तयार करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. ओवेसी म्हणाले, "जर त्यांनी एनपीआर, एनआरसी कायदे केले तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आणखी एक शाहीन बाग येईल." मात्र, यासोबतच त्यांनी पीएम मोदींना सीएए मागे घेण्याचे आवाहन देखील केले आहे. ते म्हणाले, "मी पीएम मोदी आणि भाजपला कृषी कायद्याप्रमाणे सीएए रद्द करण्याचे आवाहन करतो कारण ते संविधानाच्या विरोधात आहे."

याशिवाय रामपूरमध्ये आयोजित एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले, "पंतप्रधान मोदी हे देशाचे सर्वात मोठे नौटंकी आहेत आणि त्यांनी चुकून राजकारणात प्रवेश केला, अन्यथा चित्रपटसृष्टीतील गरीब लोकांचे काय झाले असते, मोदीजींनी सर्व पुरस्कार जिंकले असते.." कृषी कायदे मागे घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावर ही ओवेसींनी शरसंधान साधले आहे ते म्हणाले की, तीन कृषी कायदे मागे घेताना पंतप्रधान म्हणाले, "माझ्या तपस्याचा अभाव आहे, हे आपल्या देशाचे कार्यवाहक पंतप्रधान किती मोठे नौटंकी आहेत हे स्पष्टपणे दिसून येते."

ओवेसी म्हणाले, आंदोलनात 750 शेतकरी मरण पावले, तरीही त्यांनी आपली जमीन सोडली नाही आणि खंबीरपणे उभे राहिले, यालाच तपस्या म्हणतात आणि मोदी म्हणतात माझ्या तपश्चर्येत काही कमतरता होती. अहो मोदीजी, तुम्ही स्वतःला हिरो बनवण्यात कोणतीही कसर सोडत नाही.असे सांगतच ओवेसींनी आगामी निवडणुका पाहताच पंतप्रधान मोदींनीहे काळे कायदे मागे घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Live News: दहावीचा 92.38 टक्के निकाल

Morjim: लाईट नाही म्हणून मध्यरात्री केला आमदाराला फोन; जीत आरोलकरांची थेट पोलिसांत तक्रार

SCROLL FOR NEXT