Air Force Recruitment Dainik Gomantak
देश

Agneepath Air Force Scheme: हवाई दलातील भरतीला मोठा प्रतिसाद

Agnipath Recruitment Scheme: अग्निपथ योजनेतंर्गत भारतीय हवाई दलाने भरती प्रक्रिया सुरू केली असुन या योजनेला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक

भारतातील सैन्य भरतीसाठी असलेल्या अग्निपथ योजनेला विरोध सुरू आहे. तर दुसरीकडे हवाई दलातील भरतीला युवकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अग्निपथ योजनेतंर्गत भरतीसाठी दोन दिवसांत 56,960 जणांनी अर्ज केले आहेत. हा आकडा रविवारपर्यंतचा आहे. या योजनेनुसार, हवाई दलातील भरतीसाठीची नोंदणी शुक्रवारपासून सुरू झाली. (Agnipath Recruitment Scheme News)

हवाई दलाने (Air Force) रविवारी दिलेल्या माहितीनुसार, अग्निपथ योजनेनुसार, भरतीसाठीच्या अर्ज प्रक्रियेसाठी 56960 जणांनी अर्ज केले आहेत. याची नोंदणी प्रक्रिया 5 जुलै रोजी बंद होणार आहे. हवाई दलात अग्निपथ योजनेतंर्गत (Agneepath Scheme) भरतीसाठी 24 जून 2022 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. हवाई दलातील चार वर्षांच्या सेवेसाठी इच्छुक असलेल्या युवकांना careerindianairforce.cdac.in या वेबसाइटवर जाउन ऑनलाइन अर्ज करू शकता.

* अग्निवीर चार वर्षांसाठी भरती केली जाईल

अधिकृत अधिसूचनेनुसार, अग्निपथ योजनेअंतर्गत हवाई दलाच्या भरती नोंदणी प्रक्रियाची शेवटची तारिख 5 जुलै 2022 आहे. 'अग्निवीर' भरतीसाठी उमेदवारांनी पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने 14 जून रोजी अग्निपथ योजना जाहीर केली होती. या योजनेत 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी भरती केले जाईल. यापैकी 25 टक्के अग्निवीरांना नियमित सेवेत दाखल केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT