pickup  Dainik Gomantak
देश

Agneepath: हरियाणात आंदोलनाला हिंसक वळण, महेंद्रगडमध्ये पिकअपला लावली आग

हरियाणात अग्निपथ योजनेच्या विरोधात निदर्शने सुरु आहेत.

दैनिक गोमन्तक

हरियाणात अग्निपथ योजनेच्या विरोधात निदर्शने सुरु आहेत. महेंद्रगड रेल्वे स्थानकाबाहेर शनिवारी आंदोलकांनी एक वाहन उलटवले. त्याच वेळी, शेजारच्या पंजाब राज्यातील लुधियाना रेल्वे स्थानकात 50 हून अधिक आंदोलकांच्या एका गटाने तिकीट काऊंटरमध्ये घुसून मालमत्तेचे नुकसान केले. तरुणांच्या एका गटाने पिक-अप व्हॅनला आग लावली आणि तिची तोडफोड केली, असे महेंद्रगड पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (agneepath protest fire in pickup in haryanas mahendragarh railway station vandalized in ludhiana)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महेंद्रगडमध्ये सैन्य भरतीच्या नव्या योजनेच्या विरोधात जोरदार निदर्शने सुरु आहेत. रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या एका निवासी इमारतीत राहणाऱ्या एका रेल्वे अभियंत्याने सांगितले की, 'काही आंदोलक आमच्या कॅम्पसमध्ये घुसले आणि त्यांनी कार्यालय आणि जनरेटर सेटचे नुकसान केले.'

दुसरीकडे, पंजाबमध्ये (Punjab), 50 हून अधिक तरुणांचा एक गट लुधियाना रेल्वे परिसरात घुसला, असे पोलिसांनी (Police) सांगितले. या तरुणांनी तिकीट काउंटरच्या काचा फोडल्या. जालंधरमध्ये तरुणांनी मोर्चा काढून निदर्शने केली. राम मंडी चौक ते पीएपी चौकापर्यंत मोर्चा काढून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. अग्निपथ योजना रद्द करण्याची मागणी त्यांनी केंद्राकडे केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Youth Movement Against Paper Leak: अहंकाराचा पराभव अन् युवाशक्तीचा विजय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामागील 'जेन-झी'ची ताकद

Viral Video: दारूच्या नशेत जीव धोक्यात! रेल्वे रुळावर पडला तरुण; वेगात ट्रेन आली अन्... थरारक व्हिडिओ होतोय व्हायरल

Student Protest Over Paper Leak: 36 दिवसांचा लढा यशस्वी! 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनासमोर मोदी सरकारला अखेर नमते घ्यावेच लागले

Goa E Tender Process: राज्यातील काही ग्रामपंचायतींकडून ई-निविदा नियम धाब्यावर; पाच लाखांवरील टेंडर पद्धतीत गैरव्यवहार

CWG 2026 मध्ये थरारक अपघात! हाय बारवरून थेट डोक्यावर कोसळला इंग्लंडचा खेळाडू; तातडीने रुग्णालयात दाखल VIDEO

SCROLL FOR NEXT