soldiers Dainik Gomantak
देश

'सरकारचं वचन', आंदोलनानंतर माजी सैनिकांचं पेन्शन बँक खात्यात होणार जमा

आंदोलनानंतर सरकारने आज सायंकाळपर्यंत माजी सैनिकांचे पेन्शन बँक खात्यात वर्ग करण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमन्तक

आज संध्याकाळपर्यंत माजी सैनिकांची पेन्शन त्यांच्या बँक खात्यात पोहोचेल, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज माजी सैनिकांच्या पेन्शनचा मुद्दा उपस्थित करत नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. हिंदुस्तान टाईम्स या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला देत माजी काँग्रेस अध्यक्षांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार सैनिकांचा आणि देशाचा अपमान करत असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले होते.

दरम्यान, राहुल गांधींनी (Rahul Gandhi) ट्विटरवरुन म्हटलयं की, "वन रँक, वन पेन्शनच्या फसवणुकीनंतर आता मोदी सरकार 'ऑल रँक, नो पेन्शन' धोरण अवलंबत आहे... सैनिकांचा अपमान हा सैनिकांचा अपमान आहे. देश... .सरकारने माजी सैनिकांना लवकरात लवकर पेन्शन द्यावी..."

तसेच, राहुल गांधींच्या हल्ल्यानंतर, सरकारने आज संध्याकाळपर्यंत माजी सैनिकांचे पेन्शन बँक खात्यात वर्ग केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. खरं तर, हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालात असे म्हटले होते की, शेकडो माजी सैनिकांना एप्रिल महिन्याचे पेन्शन देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे यासाठी सरकारी कोणतेही कारण दिलेले नाही. अहवालानुसार, सरकारने पेन्शन वितरणासाठी नवीन ऑनलाइन पेन्शन वितरण प्रणालीचा अवलंब केल्यामुळे हे घडले असावे, ज्यामध्ये तांत्रिक त्रुटींमुळे पेन्शनचे वितरण होऊ शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT