Qutub Minar Mosque Controversy Dainik Gomantak
देश

ज्ञानवापीनंतर आता कुतुबमिनारच्या मशिदीचा वाद; ASI ने नमाजावर घातली बंदी

वाराणसीतील ज्ञानवापीनंतर कुतुबमिनारच्या मशिदीवरून आता वाद सुरु झाला आहे.

दैनिक गोमन्तक

वाराणसीतील (Varanasi) ज्ञानवापीनंतर (Gyanvapi Masjid) कुतुबमिनारच्या मशिदीवरून आता वाद सुरु झाला आहे. येथील इमाम शेर मोहम्मद यांनी आरोप केला आहे की भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने कुतुबमिनारमध्ये नमाज अदा करणे बंद करायला हवे. त्याच वेळी, आज साकेत न्यायालयात मेहरौली येथील कुतुबमिनार संकुलात हिंदू आणि जैन देवतांची पूजा तसेच पुनर्स्थापना करण्याचा अधिकार मागणाऱ्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. (After Gyanvapi now the dispute over the mosque of Qutub Minar ASI bans prayers)

पूजेच्या अधिकारासंदर्भातील या याचिका अधिवक्ता हरी शंकर जैन आणि अधिवक्ता रंजना अग्निहोत्री यांनी दाखल केल्या आहेत. कुतुबमिनारमध्ये हिंदू धर्माशी संबंधित अनेक मूर्ती असल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की एएसआयच्या अहवालात असे म्हटले गेले आहे की मोहम्मद घोरीच्या सैन्याचा कमांडर कुतुबदिन ऐबक याने 27 मंदिरांची तोडफोड केली होती, आणि त्या आवारात कुव्वत-उल-इस्लाम उभारण्यात आले.

इमाम शेर मोहम्मद यांनी सांगितले की, 13 मे रोजी एएसआयची टीम आली होती. पुढे इमाम म्हणाले की, एएसआय टीमने सांगितले की येथे नमाज अदा केली जाणार नाहीये. पण आम्ही सांगितले की फक्त 4 लोकांनाच नमाज अदा करण्याची परवानगी द्या, तसेच याशिवाय बाहेरचा कोणीही येणार नाही. पण ती परवानगी फेटाळून लावली आणि आजपासून येथे नमाज अदा होणार नाही, असे सांगण्यात आले. इमाम यांनी दावा केला आहे की, कारण विचारले असता, आम्हाला वरून आदेश आले आहेत असे सांगण्यात आले.

2010 मध्ये नमाजावर बंदी घालण्यात आली होती, खरं तर, पूर्वी कुतुबमिनारच्या मुख्य गेटजवळ बांधलेल्या छोट्या मशिदीत नमाज अदा केली जात होती. आता इमामने असा दावा केला आहे की भारतीय पुरातत्व विभागाने (एएसआय) नमाजवर बंदी घातली. तर दुसरीकडे, माजी ASI अधिकार्‍यांवर विश्वास ठेवला तर, 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स दरम्यान, नमाजांवर बंदी घालण्यात आली होती कारण नमाज अदा करण्यासंबंधी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे कोणतेही परवानगी पत्र त्यावेळी नव्हते.

त्याचवेळी 2010 नंतर 2016 मध्ये या मशिदीत पुन्हा एकदा नमाजाचे पठण करण्यास सुरुवात करण्यात आली. पूर्वी 4 ते 5 लोक त्यात नमाज अदा करत होते. पण हळूहळू नमाज पठण करणाऱ्यांची संख्या 40 वरून 50 वर पोहोचली. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही मशीद कुतुबमिनारच्या काळात उभारण्यात आली होती. त्याकाळी मुघलांचे सैनिक येथे विश्रांती घेत असत. पण हळूहळू तिचे मशिदीत रूपांतर होऊन तिथे नमाज अदा करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT