Uttarkashi Tunnel Rescue Twitter/ @ANI
देश

Uttarkashi Tunnel Rescue: मोठी बातमी! उत्तरकाशी बोगद्यातून तब्बल 17 दिवसांनी 41 कामगार बाहेर

Manish Jadhav

Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशीच्या सिल्कयारा बोगद्यात सुरु असलेले बचावकार्य यशस्वी झाले आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. या बोगद्यात 41 मजूर अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यासाठी गेल्या 16 दिवसांपासून बचावकार्य सुरु होते. बचावकार्याचा आज 17 वा दिवस असून कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यात आले आहे. संपूर्ण देश या बचाव मोहिमेवर लक्ष ठेवून होता आणि स्वतः पंतप्रधान मोदी क्षणोक्षणी अपडेट घेत होते. आता या बोगद्यातून तब्बल 17 दिवसांनी 41 कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

दरम्यान, 400 तासांहून अधिक काळ, अडचणी आणि आव्हानांनी भरलेल्या मोहिमेतील प्रत्येक अडथळ्यावर मात करुन भारतीय आणि परदेशी मशीन आणि तज्ञांद्वारे कामगारांना बाहेर काढण्यात आले. बोगद्याच्या आत आणि बाहेर 41 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना थेट रुग्णालयात नेले जाईल. आरोग्य तपासणी आणि आवश्यक उपचारानंतरच त्यांना घरी पाठवले जाईल.

12 नोव्हेंबरपासून बोगद्यात कामगार अडकले होते

उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर सिल्कयारा बोगदा आहे. 12 नोव्हेंबर रोजी या बोगद्याचा काही भाग कोसळला होता, त्यामुळे कामगार बोगद्यात अडकले होते. एनडीआरएफ, एसडीआरएफसह अनेक यंत्रणांनी रात्रंदिवस एकत्र काम केले. औगर मशिनने सुमारे 50 मीटर खोदकाम करण्यात आले. यानंतर मॅन्युअल ड्रिलिंगद्वारे उत्खनन करण्यात आले.

दिवाळीच्या दिवशी सकाळी हा अपघात झाला

उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील चारधाम रोड प्रकल्पाच्या (ऑलवेदर रोड) बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात रविवारी हा अपघात झाला. धरसू ते बरकोट शहरादरम्यान यमुनोत्री महामार्गावरील सिलक्यारा ते पॉल गावापर्यंत 4.5 किलोमीटर बोगद्याचे बांधकाम सुरु होते. दिवाळीच्या दिवशी पहाटे 4 वाजता शिफ्ट बदलत असताना बोगद्याचा 60 मीटर भाग पडला आणि काम करत असलेले कामगार आत अडकले होते.

या अपघाताची माहिती प्रथम प्लंबरने दिली

अपघाताच्या वेळी बोगद्याच्या तोंडाजवळ उपस्थित प्लंबर उपेंद्र यांच्यासमोर हा अपघात झाला. कामानिमित्त आत जात असलेल्या उपेंद्रने अपघात घडत असताना पाहिल्यावर त्याने धावत बाहेर जाऊन अलार्म वाजवला. यानंतर स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली होती.

कोणत्या राज्यातील कामगार किती?

झारखंड- 15

उत्तर प्रदेश- 8

ओडिशा-5

बिहार-5

पश्चिम बंगाल-3

उत्तराखंड-2

आसाम-2

हिमाचल प्रदेश-1

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

SCROLL FOR NEXT