Aditya Birla Group Chairman Mangalam Birla Twitter/ ANI
देश

Aditya Birla Group चे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना पद्मभूषण, राष्ट्रपतींनी दिला हा सन्मान

Aditya Birla Group Chairman Mangalam Birla: आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण प्रदान करण्यात आला आहे.

Manish Jadhav

Aditya Birla Group Chairman Mangalam Birla: आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार भारतातील (India) सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक मानला जातो.

दरम्यान, राष्ट्रपती पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये सन्मान प्रदान करतात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण (Education), क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रात हे पुरस्कार दिले जात आहेत.

तसेच, दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिन 2023 निमित्त पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आला आहे.

हा पुरस्कार मिळवणारे कुटुंबातील चौथी व्यक्ती

हा पुरस्कार मिळवणारे मंगलम बिर्ला हे त्यांच्या कुटुंबातील चौथे व्यक्ती आहेत. पूर्वी त्यांचे आजोबा श्री जी डी बिर्ला, वडील आदित्य बिर्ला, त्यांची आई सुश्री राजश्री बिर्ला आणि आता कुमार मंगलम बिर्ला यांना मिळत आहे.

कुमार मंगलम बिर्ला हे आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आहेत, जे सहा खंडांमधील 36 देशांमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली. ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत.

त्यांनी नोव्हेलिस इंक., बिर्ला कार्बन, आदित्य बिर्ला केमिकल्स, डोम्सजो फॅब्रिकर, टेरेस बे पल्प मिल, हिंदाल्को इंडस्ट्रीज लि., ग्रासिम इंडस्ट्रीज लि., अल्ट्राटेक सिमेंट लि. यासह भारतातील आणि जागतिक स्तरावरील सर्व प्रमुख समूह कंपन्यांच्या बोर्डाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT