Delhi Political Crisis
Delhi Political Crisis Dainik Gomantak
देश

Delhi Political Crisis: सौरभ भारद्वाज अन् आतिशी होणार केजरीवाल सरकारमध्ये नवे मंत्री

दैनिक गोमन्तक

Delhi Political Crisis: मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या राजीनाम्यानंतर आता सौरभ भारद्वाज आणि आतिशी अरविंद केजरीवाल सरकारमध्ये सामील होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचे राजीनामे स्वीकारले गेल्यास आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना दिल्ली सरकारमध्ये नवीन मंत्री केले जाईल. याबाबत दोन्ही आमदारांची नावे उपराज्यपालांकडे पाठवण्यात आली आहेत.

दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने नऊ महिन्यांपूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. त्याचबरोबर अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सीबीआयच्या ताब्यात आहेत. सिसोदिया यांच्याकडे अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांचा कार्यभार आहे.

नव्या मंत्र्यांची नावे लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या शपथविधीला थोडा वेळ लागू शकतो. मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली जाईल.

मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. केजरीवाल यांच्यानंतर मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षातील सर्वात मोठे नेते आहेत.

दिल्ली सरकारमध्ये त्यांच्याकडे 33 पैकी 18 विभाग होते. मनीष सिसोदिया यांच्याकडे शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, वित्त, उत्पादन शुल्क, ऊर्जा, पाणी आणि आरोग्य अशी महत्त्वाची खाती होती.

तर सत्येंद्र जैन हे 9 महिन्यांपासून तिहार तुरुंगात आहेत. सिसोदिया त्यांच्या खात्यांसोबतच सत्येंद्र जैन यांच्या विभागांचे कामही पाहत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT