PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

Watch Video: "मोदीजी, पाकिस्तानात जाऊन नवाज शरिफला अन् दुबईत शेखांना मिठी मारता, भारतीय मुस्लीमांना कधी मिठी मारणार?"

Sanjay Singh: आप नेते संजय सिंह यांनी रामपूरमध्ये भाजपच्या जाहीरनाम्यावर प्रश्न उपस्थित केला. सर्व पक्षांचा जाहीरनामा निवडणूक आयोगाकडे नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली.

Ashutosh Masgaunde

UP Politics : आपचे खासदार आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी संजय सिंह यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावरही त्यांनी खिल्ली उडवली.

मोदींची दडपशाही कधीतरी संपणार आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी इजिप्तमध्ये जातात आणि मुस्लिमांना मिठी मारतात. दुबईला जाऊन शेखांना मिठी मारतात. आता त्यांनी सांगावे की, ते भारतीय मुस्लीमांना कधी मिठी मारणार आहेत?

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर विचारमंथन करण्यासाठी संजय सिंह आज रामपूरमध्ये आले होते. आम आदमी पक्षाच्या तिकिटावर महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सभापती व नगरसेवकांची त्यांनी बैठक घेतली.

यावेळी आप खासदारा संजय सिंह यांनी भाजपचा "भारतीय झगडा पक्ष" असा उल्लेख केला. ते म्हणाले की, भाजप भांडण आणि द्वेष निर्माण करतो. जगातील सर्वात मोठा द्वेष कारखाना लोकांना हळूहळू ओळखता आला आहे.

'भारतातील मुस्लिमांनाही मिठी मारा'

संजय सिंह म्हणाले की, भारतातही अनेक चांगल्या मशिदी बांधल्या गेल्या आहेत. भारतातील मुस्लिमांनाही मिठी मारा. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका आणि इजिप्त भेटीतून भारताला काय मिळाले हे जाणून घेणे आवश्यक आहे.

संजय सिंह यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावरही प्रश्न उपस्थित केले. दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. भाजप ती किती दिवसात पूर्ण करेल.

सर्व पक्षांचा जाहीरनामा निवडणूक आयोगाकडे नोंदवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दिलेली आश्वासने किती दिवसांत पूर्ण होतील, याबाबत निवडणूक आयोगाने कालबद्ध शपथपत्र घ्यावे.

2 जुलैपासून 'आप'ची कंदील यात्रा

जाहिरणाम्याच्या नावाखाली जनतेला मूर्ख बनवून मते घेण्याचे आम्ही समर्थन करत नाही. वीज कपात आणि वाढलेल्या विजेच्या किमती या मुद्द्यावरून संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशात बत्ती गुल यात्रा काढणार असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, 2 जुलैपासून पक्ष संपूर्ण उत्तर प्रदेशात बत्ती गुल यात्रा काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तुघलकी निर्णय आला आहे. रात्रीच्या वेळी वीज 20 टक्के महाग होईल. मित्रांच्या फायद्यासाठी जनतेचा खिसा कापला जात असल्याचे ते म्हणाले. भाजप सरकारच्या या निर्णयाला आम आदमी पक्ष रस्त्यावरून संसदेपर्यंत विरोध करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच विदेश दौऱ्यावरून परतले आहेत. त्यांनी 19 जून ते 24 या दरम्यान अमेरिकाचा दौरा केला. त्यामध्ये त्यांनी अमेरिकेबरोबर अनेक करारांवर स्वाक्षरी केली. त्यानंतर पीएम मोदी इजिप्तच्या दौऱ्यावर गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कोजागरी पौर्णिमेला चमकणार 'या' 5 राशींचं नशीब! अचानक मिळू शकते गुड न्यूज, आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Sandalwood Tree: स्वतः झिजून जगाला सुगंध देणारा चंदनवृक्ष! 40 ते 50 वर्षांच्या वाढीमागचं निसर्गाचं अद्भुत रहस्य

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

SCROLL FOR NEXT