Aamir Khan  Dainik Gomantak
देश

Aamir Khan Video: पहिल्यांदाच जगासमोर आलं 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चं हिडन टॅलेन्ट, VIDEO पाहून विश्वासच बसणार नाही!

Aamir Khan Singing Video: अलीकडेच सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात तो गाताना दिसत आहे.

Manish Jadhav

Aamir Khan Singing Video: बॉलीवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे, अभिनयामुळे किंवा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. मात्र, यावेळी तो त्याच्या अभिनयामुळे किंवा कोणत्याही नव्या चित्रपटाच्या घोषणेमुळे नाही, तर त्याच्या गायकीच्या प्रतिभेमुळे प्रकाशझोतात आला आहे. अलीकडेच सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात तो गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला असून त्याच्या या नव्या अवतारावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

आमिर खानच्या गायकीचा व्हिडिओ व्हायरल

आमिर खानचा (Aamir Khan) हा व्हिडिओ प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या म्युझिक अकादमीतील एका कार्यक्रमातील आहे. व्हिडिओमध्ये आमिर खान अतिशय साध्या वेशात दिसत असून तो एका गायकासोबत राग गुणगुणत आहे. त्याच्या आवाजातील गोडवा आणि सूर ऐकून अनेकांना सुखद धक्का बसला आहे. आमिरच्या अभिनयाची ताकद जगजाहीर आहे, पण त्याच्यातील गायकाची ही बाजू पाहून चाहते खूप आनंदित झाले आहेत. या व्हिडिओवर चाहते 'हार्ट' इमोजी आणि कौतुकाचे संदेश पाठवत आहेत, ज्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

तीनही खान एकत्र येणार? अटकळांना उधाण

दरम्यान, आमिर खानशी संबंधित आणखी एका व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये एका शूटिंग सेटवर तीन व्हॅनिटी व्हॅन उभ्या असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हॅन्सवर शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांची नावे लिहिलेली आहेत. व्हिडिओ बनवणारी व्यक्ती म्हणते, 'तीन्ही एकत्र... हा कोणता सिनेमा आहे भाई?' हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बॉलीवूडमध्ये अनेक वर्षांपासून असलेली चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे की, आता हे तिन्ही दिग्गज सुपरस्टार्स एकत्र पडद्यावर दिसणार आहेत.

हे तिन्ही खान एकत्र दिसण्याची अनेक दशकांपासून चाहत्यांची इच्छा आहे, पण त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि वैयक्तिक कारणांमुळे हे शक्य झाले नव्हते. आता हा व्हिडिओ समोर आल्यामुळे या चर्चांना पुन्हा बळ मिळाले आहे. हा व्हिडिओ जुना आहे की नवीन हे अजून स्पष्ट झालेले नाही, पण त्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.

आर्यन खानच्या वेब सीरिजमध्ये दिसणार का?

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या आगामी वेब सीरिज 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' (The Dads of Bollywood) मध्ये शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांची झलक पाहायला मिळू शकते. ही वेब सीरिज बॉलीवूडच्या दिग्गज बापांवर आधारित असल्याचे म्हटले जाते.

या सीरिजमध्ये शाहरुख खान स्वतःच्याच भूमिकेत दिसणार असून तो कथेला आवाज (Narrator) देणार असल्याचेही बोलले जात आहे. तर सलमान आणि आमिर खान हे केवळ पाहुण्या कलाकाराच्या (Cameo) भूमिकेत दिसू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. या बातमीमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कारण भलेही ही भूमिका मोठी नसली तरी, त्यांना आपल्या तीन लाडक्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे.

आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान (Salman Khan) हे भारतीय चित्रपटसृष्टीचे तीन आधारस्तंभ मानले जातात. त्यांची एकत्र येण्याची प्रत्येक बातमी मोठी हेडलाईन बनते. त्यांच्या अभिनयाचा आणि स्टारडमचा प्रभाव इतका मोठा आहे की, त्यांची एकत्र असलेली उपस्थिती चित्रपटाच्या यशाची हमी मानली जाते. सध्या आमिर खान त्याच्या गाण्यामुळे आणि या संभाव्य प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे, ज्यातून चाहत्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: इंग्लंडला डबल झटका! आधी कांगारुंनी मैदानात दिली मात, नंतर WTC पॉइंट टेबलमध्ये झाली घसरण; जाणून घ्या भारताची सध्याची स्थिती

गोव्यात जमीनमालकांना झटका! मुंडकारांना हक्क मिळेपर्यंत जमिनीची विक्री होणार नाही; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

SCROLL FOR NEXT