Isudan Gadhvi Dainik Gomantak
देश

Gujarat Election: 'आप' कडून इसुदान गढवी बनले मुख्यमंत्री पदाचा चेहरा

Aam Aadmi Party: आम आदमी पार्टीचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Aam Aadmi Party: आम आदमी पार्टीचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. शुक्रवारी 'पुनरावलोकन'चा निकाल जाहीर करताना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. केजरीवाल म्हणाले की, "आज आम्ही गुजरातचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नाही, तर गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री घोषित करत आहोत. आम्ही 5-7 दिवसांपूर्वी फोन नंबर आणि ईमेल देऊन लोकांचे मत विचारले. 4 प्रकारे मेसेज करायला सांगितले होते. यामध्ये लोकांनी भरघोस मतदान केले. 16,48,500 मते प्राप्त झाली. 73% लोकांनी 'इसुदान गढवी' यांचे नाव घेतले.''

तसेच, गुजरातमध्ये आम आदमी पार्टी सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त करत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, 'गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची नव्हे, तर गुजरातच्या पुढील मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करत आहोत.'

केजरीवाल पुढे म्हणाले की, "आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) एक नवी आशा आहे. आम्ही खोलीत बसून मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवत नाही. पंजाबमध्ये, भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पंजाबच्या जनतेने निवडून दिले. दिल्लीत आम्ही पहिल्यांदा जिंकलो तेव्हा आम्हाला एकाही सर्व्हेने एकही जागा दिली नाही. गुजरातमध्येही (Gujarat) दिल्लीसारखे सगळे सर्व्हे फेल होतील आणि आमचे सरकार स्थापन होईल.'

दुसरीकडे, 10 जानेवारी 1982 रोजी जामनगरमधील एका गावात जन्मलेले गढवी हे व्यवसायाने पत्रकार आहेत. गुजराती पत्रकारितेतील टीव्हीचा ते एक प्रसिद्ध चेहरा आहेत. प्राइम टाइम अँकरिंगमुळे लोकप्रिय झालेले गढवी एका गुजराती वाहिनीचे प्रमुख देखील राहिले आहेत. जून 2021 मध्ये त्यांनी पत्रकारितेला अलविदा म्हणत आम आदमी पार्टीसोबत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT