Rajasthan Crime Dainik Gomantak
देश

Rajasthan Crime : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर महिलेचा बलात्कार

वॉशरूममध्ये जाताच साधला डाव

दैनिक गोमंतक

राजस्थानमध्ये एक विकृत प्रकार घडला असून महिलेनेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडिता वॉशरूममध्ये जाताच संशयित महिलेने हे कृत्य केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

(A shocking incident has taken place in Rajasthan's Sirohi where a minor girl was raped by a woman )

मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान येथील सिरोही येथे एका अल्पवयीन मुलीवर महिलेनेच बलात्कार केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.आज संशयित महिलेला अटक केली असून या घटनेने पोलीस देखील चक्रावले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, राजस्थान येथील सिरोही येथे एक अल्पवयीन मुलगी वॉशरूममध्ये गेली असता वॉशरूममध्येच तिच्यावर बलात्कार झाला असल्याची घटना 28 नोव्हेंबर 2022 रोजी घडली आहे. याबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी तपास पथके तयार करत आज संशयित महिलेला अटक केली आहे.

राजस्थान पोलिसांना पीडितेच्या वैद्यकीय चाचणी अहवालावरुन माहिती मिळाली असून धक्कादायक बाब म्हणजे संशयित व्यक्ती ही महिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिस देखील चक्रावले आहेत. तसेच संशयित महिलेला आज अटक करण्यात आली असल्याची माहिती स्टेशन ऑफिसर माया पंडित (Maya Pandit, Station Officer, Sirohi ) यांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु असून या गुन्ह्यात आणखी कोण आरोपी सहभागी होते का ? याचा तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT