Crime News
Crime News Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: लऊनऊमध्ये तरुणाचे घृणास्पद कृत्य, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई; जाणून घ्या काय घडलं?

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: मध्य प्रदेशातून काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीवर तरुणाने लघवी केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर आता उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून अशीच घटना समोर आली आहे. येथे शेतात झोपलेल्या मजुराच्या चेहऱ्यावर एका तरुणाने लघवी केली.

दरम्यान, त्याच्या या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर तो काही वेळातच व्हायरल झाला. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. यानंतर मजुराच्या पत्नीने तात्काळ पोलिसांत (Police) तक्रार नोंदवली. हा व्हिडीओ व्हायरल होताच आणि तक्रार प्राप्त होताच पोलिसही अॅक्शनमोड आले. लघवी करणाऱ्या तरुणाला आता अटक करण्यात आली आहे. दारुच्या नशेत हा गुन्हा घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) होताच राज्यात एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून लोक चांगलेच संतापले. लोकांनी आरोपी तरुणावर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. घृणास्पद कृत्य करत असताना आरोपी तरुण खिदळतान व्हिडिओमध्ये दिसत आहे. घटनास्थळी काही लोकही उपस्थित होते, मात्र ते त्यावेळी मूक प्रेक्षक म्हणून उभे असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत.

पूर्व विभागाचे पोलिस उपायुक्त दुर्गेश कुमार म्हणाले की, पोलिसांनी या संदर्भात एका व्यक्तीला अटक केली आहे आणि आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवला जात आहे. ते पुढे म्हणाले की, दुबग्गा पोलिसांनी पीडित मजूराच्या पत्नीच्या तक्रारीची दखल घेतली आहे. दुबग्गा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोंदिया खेडा येथे रविवारी दुपारी ही घटना घडली.

डीसीपींनी सांगितले की, हा व्हिडिओ गावातील भाजी मार्केटजवळील मोकळ्या सरकारी जमिनीजवळचा आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे अजय कुमार रावत आणि संजीव उर्फ ​​संजय मौर्य हे दोघेजण रोजंदारीवर काम करत होते. पीडित आणि आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत. रविवारी दुपारी काम आटोपल्यानंतर दोघांनी दारु प्यायली. जेव्हा रावत झोपी गेला तेव्हा मौर्यने रावत याच्या चेहऱ्यावर लघवी केली. दुबग्गा पोलिस ठाण्याचे प्रभारी अभिनव कुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दारुच्या नशेमुळे हा गुन्हा घडला आहे. यामागे दुसरा कोणताही हेतू नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Bus Service In Panjim: सहा इलेक्ट्रिक बसगाड्यांचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन

Shri Damodar Temple Zambaulim: ५६.६८ किलो सोन्याच्या दागिन्यांची अफरातफर

Goa Police: गोवा पोलिसांचा आणखी एक प्रताप! PSI ची महिलेला बेदम मारहाण, 'बूट चाट' म्हणणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Allahabad High Court: एक दिवस भारतातील बहुसंख्य लोक अल्पसंख्याक होतील...धर्मांतरावर अलाहाबाद उच्च न्यायालयाची गंभीर टिप्पणी

Goa Crime: जेवण देतो, असं सांगत 16 वर्षांच्या मुलीला फ्लॅटवर नेलं; 58 वर्षांच्या नराधमाने केला बलात्कार

SCROLL FOR NEXT