Jammu And Kashmir Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: बांदीपोरात बिहारच्या मजुराची गोळ्या झाडून हत्या

Bandipora: जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे एका स्थलांतरित मजूराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे एका स्थलांतरित मजुराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोहम्मद अमरेज असे या प्रवासी मजुराचे नाव आहे. ते बिहारचे रहिवासी होते. बंदिपारो जिल्ह्यातील अजस भागात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी मोहम्मद यांच्यावर गोळ्या झाडल्या.

दरम्यान, न्यूज एजन्सी एएनआयने काश्मीर पोलिसांच्या हवाल्याने म्हटले की, "मध्यरात्री, बांदीपोरा येथे बिहारमधील (Bihar) मोहम्मद अमरेज या स्थलांतरित मजुरावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडल्या, अपघातात मोहम्मद जखमी झाले. त्यांनतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले असता तिथेच त्यांचा मृत्यू झाला.''

दुसरीकडे, गेल्या आठवडाभरात स्थलांतरित मजुरांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. गेल्या आठवड्यातच बिहारमधील मोहम्मद मुमताज या स्थलांतरित मजुराची हत्या करण्यात आली होती. पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील गदूरा गावात दहशतवाद्यांनी (Terrorists) परप्रांतीय मजुरांवर ग्रेनेड फेकले, ज्यात मुमताज ठार झाले, तर दोन जण जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT