Guwahati HC Jeans Row Dainik Gomantak
देश

Guwahati HC Jeans Row: जीन्स घालून हायकोर्टात आला वकील... न्यायालयाने केली 'ही' कारवाई

वकीलाच्या चुकीचा याचिकाकर्त्याला फटका

Akshay Nirmale

Guwahati HC Jeans Row: भारतात अनेकदा कपड्यांवरून किंवा गणवेशाचा प्रोटोकॉल न पाळण्याचे प्रकार घडत असतात. त्यातून वाद निर्माण होत असतो. असाच एक प्रकार शनिवारी आसाममध्ये घडला आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयात एक वकील चक्क जीन्स घालून आल्याने न्यायालयाने त्याच्यावर कारवाई केली आहे. त्यानंतर या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

जीन्स परिधान करून येणे या वकीलाला महागात पडले आहे. याचिकाकर्त्याच्या सुनावणीसाठी हा वकील न्यायालयात आला होता. पण त्याने जीन्स परिधान केलेली पाहून न्यायाधीशांनी संबंधित प्रकरणाची सुनावणीच घेतली नाही. ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे वकीलाच्या चुकीमुळे अशिलाला मनस्ताप सोसावा लागला आहे.

बी. के. महाजन असे या वकीलाचे नाव आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने पोलिस कर्मचाऱ्यांना अॅड. महाजन यांना न्यायालयाच्या आवारातून बाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी महाजन यांना न्यायालय आवाराच्या बाहेर सोडले.

दरम्यान, सार्वजनिक स्थळांवर कसा पोशाख असावा याचे काही आडाखे लोकांच्या मनात ठरलेले असतात. विशेषतः वेस्टर्न कपड्यांना अनेकांचा विनाकारण विरोध दिसून येतो. तर काहीजण मात्र वेस्टर्न कपड्यांना असलेल्या विरोधाचे सयुक्तिक समर्थनही करत असतात.

सरकारी सेवेतील अधिकारी, किंवा सरकारी आस्थापनांत येताना कसे यावे काही संकेत असल्याचे काही जण मानतात. वकीलांकडून अधिक जबाबदार वर्तनाची अपेक्षा केली जाते. जीन्स हा पोशाख वकीलांसाठी न्यायालयाच्या आवारात योग्य नाही, असे काहींचे मत आहे.

वकीलांनी त्यांना दिलेल्या पोशाखात येऊन न्यायालयाच्या गरिमेचे पालन करावे, असे संकेत आहेत. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, देशातील उदारमतवादी गट नेहमीच कपडे किंवा इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा प्रश्न सुटणे जास्त महत्वाचे मानत आला आहे. त्यामुळे अशा घटनांवरून टीकाही होत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT