A 51-year-old Maldivian passenger has been arrested for molesting an air hostess on a Male-Bengaluru flight:
माले-बेंगळुरू फ्लाइटमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग केल्याप्रकरणी मालदीवच्या 51 वर्षीय प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
अक्रम अहमद असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्रमला बेंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली.
बेंगळुरू ईशान्यचे डीसीपी लक्ष्मी प्रसाद यांनी या घटनेला दुजोरा दिला. ते म्हणाले की इंडिगो केबिन क्रूने आरोपी अक्रमवर लैंगिक छळाचे आरोप लावले.
शुक्रवारी मालेहून बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो (Indigo) फ्लाइट क्रमांक 6E 1128 मध्ये ही घटना घडली, असे त्यांनी सांगितले.
तक्रारीनुसार, दुपारी 3.45 वाजता माले येथून टेक ऑफ केल्यानंतर अक्रमने एअर होस्टेसकडे जाऊन बिअर मागितली. एअरहोस्टेसने बिअर आणल्यावर तो फ्लर्ट करू लागला.
यावेळी फ्लाईटमध्ये उपस्थित एअर होस्टेसने हस्तक्षेप केला, परंतु अक्रमने आपले गैरवर्तन सुरुच ठेवले.
अखेरीस, एअर होस्टेसने तिच्या वरिष्ठांकडे तक्रार केली ज्यानंतर विमान बेंगळुरूमध्ये उतरल्यानंतर अक्रमला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
तक्रार करणाऱ्या एअर होस्टेसने सांगितले की, जेव्हा मी बिअर घेऊन पोहोचली तेव्हा अक्रमने गैरवर्तन केले आणि "मी 51 वर्षांपासून तुझ्यासारखी मुलगी शोधत असल्याचे म्हणाला".
त्यानंतर त्याने 10 डॉलरच्या बिअरसाठी 100 डॉलर दिले आणि उरलेले पैसे मला ठेवण्यास सांगितले. तक्रारीनुसार, महिलेने या सर्वाला विरोध केला पण आरोपीने तिचा आणखी छळ केला आणि अयोग्यरित्या स्पर्श केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.