Cyber Crime Dainik Gomantak
देश

Cyber Fraud: ते टास्क देत राहिले अन् इकडे... गोष्ट 712 कोटींच्या सायबर फ्रॉडची

Cyber Crime: जेव्हा पीडिताला नफा काढून घ्यायचा होता तेव्हा त्याला शुल्क म्हणून 17 लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

Ashutosh Masgaunde

Hyderabad Police Exposed 712 Crore Cyber Fraud:

गेल्या आठवड्यात हैदराबाद पोलिसांनी ७१२ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करत सायबर चोरटे परदेशात बसून अनेक सामान्यांना गंडा घालत आहेत.

हैदराबादमधून समोर आलेल्या तीनही मोठ्या प्रकरणातील प्रमुख आरोपी हे चिनी नागरिक आहेत. हे चिनी नागरिक त्यांच्यामार्फत भारतासह अन्य ठिकाणी हे रॅकेट चालवत होते.

नुकत्याच उघड झालेल्या प्रकरणात, दुबई आणि चीनस्थित आरोपींशी संबंध असल्याच्या आरोपावरून मुंबई, लखनौ, गुजरात आणि हैदराबाद येथून नऊ आरोपींना अटक केली आहे.

प्रकरणाचा उलगडा...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत भारतातील १५,००० गुंतवणुकदारांची ७१२ कोटी रुपयांची फसवणूक केली. आणि हे पैसे दुबईमार्गे क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात चीनला पाठवले.

प्रकाश मूलचंदभाई प्रजापती, कुमार प्रजापती, नईमुद्दीन वहीदुद्दीन शेख, गगन कुमार सोनी, परवीज उर्फ ​​गुड्डू, शमीर खान, मोहम्मद मुनाव्वर, शाह सुमैर आणि अरुल दास अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हैदराबादच्या पीडितांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एप्रिलमध्ये या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. त्यानंतर गुंतवणुकीच्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला.

पीडितांचा विश्वास जिंकण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांनी सुरुवातीला त्यांना चांगला परतावा दिला. गुंतवणूकदारांना अधिक गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. पीडित व्यक्ती जेव्हा पैसे जमा करत असे किंवा गुंतवणूक करत असे, तेव्हा त्याची गुंतवणूक रक्कम ऑनलाइन वॉलेटप्रमाणे दाखवली जात असे. पैसे गुंतवणे, पैसे काढणे असे पर्यायही त्यामध्ये होते.
सीव्ही आनंद: पोलीस आयुक्त हैदराबाद

नोकरीच्या आमिषाने अनेकजण जाळ्यात

गुंतवणुकीसह अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून लोकांना फसवणाऱ्या एका टोळीच्या जाळ्यात तक्रारदार अडकला.

पीडितांना टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपवर संपर्क साधण्यात आला आणि त्यांना यूट्यूब व्हिडिओ लाइक करणे किंवा Google अपडेट करण्याचे सोपे काम देण्यात आले. तसेच पीडितांना सुरुवातीला 5,000 रुपयांपर्यंतची छोटी गुंतवणूक करण्यास सांगितले होते.

अन् फसणूक झाल्याची जाणीव झाली

यामध्ये पीडितांना सर्व टास्क्स पूर्ण करेपर्यंत गुंतवणूक केलेले पैसे काढण्यास मनाई करण्यात आली होती. तोपर्यंत बहुतेकांनी ५ ते ६ लाख रुपये गुंतवले होते.

हैदराबादमधील पीडितेच्या बाबतीत, त्याला प्रत्येकी 30 टास्कचे 4 सेट देण्यात आले होते. पहिल्या सेटमध्ये त्याने 25,000 रुपये भरले आणि वेबसाइटवर 20,000 रुपये नफा कमावला. परंतु त्याला पैसे काढण्याची परवानगी नव्हती.

चौकशी केली असता, या पीडिताला सांगण्यात आले कमावलेले पैसे काढण्यासाठी त्याला सर्व चार सेट पूर्ण करावे लागतील.

पीडितेने नंतरच्या सेटमध्ये जास्त रक्कम गुंतवली. जेव्हा त्याला नफा काढून घ्यायचा होता तेव्हा त्याला पैसे काढण्याचे शुल्क म्हणून 17 लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. तेव्हाच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

फसवणुकीच्या रकमेतून क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरुवातीला असे आढळून आले की पीडिताचे 28 लाख रुपये राधिका मार्केटिंगच्या नावासह सहा खात्यांमध्ये हस्तांतरित केले गेले. तेथून इतर विविध भारतीय बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले गेले आणि शेवटी फसवणूक करून पैसे दुबईला पाठवले. पुढे हेच पैस क्रिप्टो करन्सी करण्यासाठी वापरले होते.

राधिका मार्केटिंगच्या नावाने हे खाते हैदराबादचा मुनावर चालवत होता. तपासात समोर आले की, तो अरुल दास, शाह सुमैर आणि शमीर खान हे सर्व लखनौचे रहिवासी असून मनीष, विकास यांच्या सांगण्यावरून शेल कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडण्यासाठी लखनऊला गेला होता.

त्याने 33 शेल कंपन्या आणि 61 खाती उघडून मनीषला दिली. त्यांनी ही खाती प्रकाश प्रजापती यांचा सहकारी कुमार प्रजापती याला विकली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादचा रहिवासी असलेला प्रकाश प्रजापती चायनीज ली लू ग्वांगझू, नान ये, केविन जुन आदींशी संबंधित आहे.

दुबई व चीनमधील रिमोट ऍक्सेस अॅप्सद्वारे ही खाती ऑपरेट करण्यासाठी भारतीय बँक खात्यांचा पुरवठा आणि ओटीपी पुरवण्यासाठी तो चिनी आरोपींशी समन्वय साधत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT