7 people including child charred to death as vehicle in Chhindwara  ANI
देश

मध्य प्रदेशात भीषण अपघात, वऱ्हाड घेऊन जाणारी गाडी विहिरीत पडल्याने 7 जणांचा मृत्यू

छिंदवाडा येथे मोठी दुर्घटना घडली. लग्नाच्या वऱ्हाडी मंडळींनी भरलेले वाहन विहिरीत पडले.

दैनिक गोमन्तक

छिंदवाडा येथे मोठी दुर्घटना घडली. लग्नाच्या वऱ्हाडी मंडळींनी भरलेले वाहन विहिरीत पडले. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. यात सहा जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात छिंदवाडा जिल्ह्यातील मोहखेडा पोलीस स्टेशन परिसरात झाला. परिसरातील कोडामाळ गावात बुधवारी रात्री वऱ्हाडी मंडळींनी भरलेली बोलेरो जीप विहिरीत पडली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. आज सकाळी सात मृतदेह आणि बोलेरो विहिरीतून बाहेर काढण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजीपाणी गावात मिरवणूक निघाली होती. बुधवारी रात्री उशिरा मिरवणुकीवरून परतत असलेली बोलेरो गाडी दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडली. यादरम्यान जीपमधील निष्पाप बालकासह सात जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बोलेरो क्रेनच्या मदतीने बाहेर काढली, आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

बुधवारी रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बोलेरो अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला शेतात असलेल्या विहिरीत पडली. रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर तात्काळ मोहखेड पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या मदतीने बोलेरो गाडी बाहेर काढली. टीआयच्या माहितीनुसार सर्व मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

SCROLL FOR NEXT