Couple Killed Childrens and Cummits sucide Dainik Gomantak
देश

Kerala Crime News: "आधी तीन मुलांची हत्या आणि मग..." वाचा, केरळमधील हृदयद्रावक घटना

एकाच घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

 5 people, including 3 children, found dead

केरळमधील कन्नूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील पाच जण एका घरात मृतावस्थेत आढळून आले आहेत.

एकाच घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हे खळबळजनक प्रकरण चेरपुझा येथील असल्याचे सांगितले जात आहे. चेरपुझा येथील एका घरात पाच जणांचे कुटुंब राहत होते. बुधवारी सकाळी येथे तीन मुलांसह पाच जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

घाईगडबडीत पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

मुलांना मारल्यानंतर फाशी!

प्राथमिक तपासात हा खून आणि आत्महत्येचा प्रकार असल्याचे समजते. या जोडप्याने आधी तीन मुलांची हत्या केली आणि नंतर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

तिन्ही मुले 12 वर्षाखालील आहेत. सूरज, सुरभी आणि सुजित अशी त्यांची नावे आहेत. त्याचबरोबर पती-पत्नीची ओळख शाजी आणि श्रीजा अशी झाली आहे.

गेल्या आठवड्यात लग्न  

या जोडप्याचे गेल्या आठवड्यातच लग्न झाले आहे. मृत सापडलेली तीन मुले ही महिलेच्या पहिल्या लग्नातील होती. मुलांचे मृतदेह जिन्यावर लटकलेल्या अवस्थेत आढळले, तर दाम्पत्याचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले.

श्रीजाच्या शेजारी चेरुवथूर यांनी सांगितले की तिची तिन्ही मुले तिच्या पहिल्या लग्नातील आहेत. मृत पती-पत्नीचे 16 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. तपासात शाजीला दुसरी पत्नी असून तिला तिच्यापासून दोन मुले असल्याचे निष्पन्न झाले. ज्या घरात ही घटना घडली ते घर श्रीजाच्या पहिल्या पतीचे होते.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना 23-24 मे च्या रात्री घडली. आजूबाजूच्या लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

शाजी आणि श्रीजा यांच्यात सतत मारहाण होत असे, यामुळे त्यांच्यावर अनेक गुन्हे  दाखल आहेत. याच कारणावरून पती-पत्नी दोघांनी आधी मुलांची हत्या करून मृतदेह पंख्याला लटकवून स्वतःही आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT