Children Dainik Gomantak
देश

देशभरात 2020 मध्ये POCSO अंतर्गत 47 हजारांहून अधिक प्रकरणांची नोंद

POCSO Low: देशात लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांना लगाम घालणे कठीण होत चालले आहे.

दैनिक गोमन्तक

POCSO: देशात लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांना लगाम घालणे कठीण होत चालले आहे. 2020 मध्ये POCSO कायद्यांतर्गत एकूण 47 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. सरकारने शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिली. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण 39.6 टक्के आहे.

दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (Marxists) खासदार एस व्यंकटेशन यांनी कायद्यांतर्गत प्रलंबित प्रकरणांवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो (NCRB) द्वारे संकलित केलेली राज्यवार आकडेवारी सभागृहात मांडली. नोंदणीकृत प्रकरणांमध्ये, उत्तर प्रदेश 6,898 प्रकरणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र (Maharashtra) (5,687) आणि मध्य प्रदेश (5,648) आहेत.

यूपीमध्ये 70 टक्के प्रमाण

आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दोषारोप सिद्ध होण्याचे प्रमाण 70.7 टक्के होते, तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे आकडे अनुक्रमे 30.9 टक्के आणि 37.2 टक्के होते. दुसरीकडे, मणिपूर (Manipur) हे एकमेव राज्य होते, जिथे सलग तीन वर्षे दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण 100 टक्के होते. इराणी पुढे म्हणाल्या की, '2020 च्या अखेरीस 170,000 प्रकरणे प्रलंबित होती, जी 2018 (108129) पेक्षा 57.4 टक्के जास्त होती.'

लडाख आणि चंदीगडमध्ये एकही प्रकरण नाही

2020 मध्ये, लडाख आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशांमध्ये POCSO कायद्यातर्गंत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. तथापि, नंतर एका प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले. वर्षाच्या अखेरीस दोन व्यक्तींवर आरोप ठेवण्यात आले. त्याच वेळी, गोवा (Goa) आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी पाच प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT