Jammu & Kashmir | congress Dainik Gomantak
देश

Jammu & Kashmir: गुलाब नबी आझाद यांच्या पक्षातील 17 नेत्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी

भावनेच्या भरात पक्ष सोडल्याची कबुली

Akshay Nirmale

Jammu & Kashmir: जम्मू-काश्मीरमधील 17 नेत्यांनी शुक्रवारी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री तारा चंद आणि माजी पीसीसी प्रमुख पीरजादा मोहम्मद सईद यांचा समावेश आहे. हे तेच नेते आहेत जे दोन महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रॅटिक आझाद पक्षात (डीएपी) सामील झाले होते. यावेळी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपालही उपस्थित होते.

नेत्यांचे स्वागत करताना, वेणुगोपाल म्हणाले की हा पक्षासाठी आनंदाचा दिवस आहे कारण हे नेते दोन आठवड्यांनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल होणार्‍या भारत जोडो यात्रेपूर्वी घरी परतले आहेत. भारत जोडो यात्रा ही देशातील एक मोठी चळवळ बनली आहे, त्यामुळेच या सर्व नेत्यांनी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे.

ही फक्त सुरुवात आहे आणि जेव्हा भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करेल तेव्हा काँग्रेसची विचारधारा असलेले सर्व लोक आणि ज्यांना अखंड भारत हवा आहे ते पक्षात सामील होतील. मला वाटते की हे नेते दोन महिन्यांच्या रजेवर गेले होते. काँग्रेसच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्यांचे भारत जोडो यात्रेत स्वागत आहे. दरम्यान, काँग्रेसमध्ये परतण्यासाठी गुलाम नबी आझाद यांच्याशी काही बोलणी सुरू आहेत का, असे विचारले असता, वेणुगोपाल यांनी अशा कोणत्याही चर्चेचा इन्कार केला.

पक्षाचे नेते जयराम रमेश म्हणाले की, शुक्रवारी एकूण 19 नेते काँग्रेसमध्ये सामील होणार होते, परंतु केवळ 17 नेते दिल्लीत येऊन सामील होऊ शकले. हा पहिला टप्पा असून इतरही लवकरच सामील होतील.

तारा चंद म्हणाले की, आम्ही भावनेच्या भरात आणि मैत्रीसाठी घाईघाईने पक्ष सोडला होता. काँग्रेसने माझ्यासारख्या गरीब माणसाला तिकीट दिले, आमदार केले, सीएलपी नेता केले. आम्ही पुन्हा काँग्रेस पक्षात आलो आहोत. पीरजादा म्हणाले की, मी 50 वर्षे काँग्रेसमध्ये आहे, विविध पदांवर काम केले, 4 वेळा मंत्री झालो. माझ्याकडून चूक झाली, मी भावनिक झालो आणि जवळजवळ दोन महिने झोपू शकलो नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT