Excellence in Investigation |india Dainik Gomantak
देश

Union Home Minister's Medal: 28 महिलांसह 151 पोलीस कर्मचार्‍यांचा गौरव

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून यावेळी 151 पोलीस कर्मचार्‍यांना तपासात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक 2022 प्रदान करण्यात आले

दैनिक गोमन्तक

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून 151 पोलीस कर्मचार्‍यांना तपासात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक 2022 प्रदान करण्यात आले. या 151 पोलिसांमध्ये सीबीआयचे 15, महाराष्ट्रातील 11, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील 10-10, राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील 8-8 पोलिसांचा समावेश आहे. याशिवाय इतर राज्यांतील पोलिसांनाही तपासातील उत्कृष्टतेचे 'गृहमंत्री पदक' प्रदान करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 151 पोलिसांपैकी 28 महिला पोलिस अधिकाऱ्यांनाही पदके देण्यात आली आहेत.

2018 पासून देण्यात येत आहे

हे पदक 2018 पासून कोणत्याही गुन्ह्याच्या तपासात (Excellence in Investigation) उच्च मापदंड प्रस्थापित करून कामात प्रामाणिकपणा, निष्ठा आणि असामान्य धाडस दाखविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. पोलीस (Police) कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे हा या पदकाचा उद्देश आहे. 2018 मध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी पाच पोलिस पदके सुरू केली होती. यामध्ये स्पेशल ऑपरेशन्स मेडल, पोलिस इंटरनल सिक्युरिटी सर्व्हिस मेडल, एक्स्ट्राऑर्डिनरी स्किल्स मेडल, उत्कृष्ठ आणि अति उत्कृष्ट सेवा मेडल आणि मेडल ऑफ एक्सलन्स इन इन्व्हेस्टिगेशन यांचा समावेश आहे.

2020 मध्ये 121 पोलिसांना पदके मिळाली

2020 मध्ये 121 पोलिसांना केंद्रीय 'गृहमंत्री पदक ऑफ एक्सलन्स इन इन्व्हेस्टिगेशन' देण्यात आले. यापैकी 15 सीबीआयचे, 10 मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांचे, आठ उत्तर प्रदेश पोलिसांचे, सात केरळ आणि पश्चिम बंगाल पोलिसांचे आणि उर्वरित इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील होते. यामध्ये 21 महिला पोलिसांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT