Chandrayaan 3 Dainik Gomantak
देश

Chandrayaan 3: दहा मुद्यांत जाणून घ्या, भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान 3 मोहिमेबद्दल सर्वकाही

Chandrayaan 3 News: चांद्रयान-3 थोड्याच वेळात श्रीहरीकोटा येथून लॉन्च कले जाणार आहे. यासाठी शेकडो शास्त्रज्ञांनी पूर्ण तयारी केली आहे. चांद्रयान-३ चंद्राचे लाखो किलोमीटरचे अंतर सुमारे ४२ दिवसांत पार करेल.

Ashutosh Masgaunde

10 Points of Chandrayaan 3 Launch: इस्रोची चांद्रयान-३ मोहीम प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. आज दुपारी 2.35 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे प्रक्षेपण केले जाईल.

आज सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागतील. महाबली रॉकेट चांद्रयान-3 सोबत उड्डाण करताच सर्व शास्त्रज्ञांच्या नजरा संगणकावर खिळल्या जातील.

1. चांद्रयान-३ चे कार्य

चांद्रयान-३ चा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर त्याचे काम सुरू करेल. हा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाशी संबंधित माहिती इस्रोमध्ये बसलेल्या शास्त्रज्ञांना पाठवेल. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाची रचना आणि तेथे उपलब्ध पाण्याची माहिती देईल. .

2. चांद्रयान-३ मोहिमेची किंमत

चांद्रयान-3 मोहिमेची संपूर्ण किंमत सुमारे 615 कोटी रुपये आहे.

3. चांद्रयान-3 मोहिम चांद्रयान-2 पेक्षा स्वस्त

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-३ मध्ये ऑर्बिटर बनवलेले नाही. यावेळी प्रोपल्शन मॉड्यूलचा वापर करण्यात आला आहे. जो संवाद उपग्रहासारखे काम करेल.

म्हणजेच लँडर मॉड्युल चंद्राजवळ सोडल्यास पृथ्वी आणि लँडर यांच्यात संवाद साधण्यास मदत होईल. याशिवाय दूर अंतराळात असलेल्या एक्सोप्लॅनेटचा अभ्यास करणार आहे. त्यामुळे त्याची किंमत कमी झाली आहे. ऑर्बिटरमध्ये लागणाऱ्या खर्चाच्या तुलनेत हे स्वस्तात बनवले जाते.

4. चांद्रयान-३ चा प्रवास वेळ

चांद्रयान-3 14 जुलै रोजी 2.35 मिनिटांनी प्रक्षेपित होईल. याच्या लँडरचे 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग होईल. चांद्रयान लाँच व्हेईकल मार्क-III वरून प्रक्षेपित केले जाईल.

प्रोपल्शन मॉड्यूल

5. चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर 42 दिवसांत पोहचणार

चांद्रयान-3 14 जुलै रोजी प्रक्षेपित होणार आहे. यानंतर, लँडर 23-24 ऑगस्ट दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्याची अपेक्षा आहे.

म्हणजेच चांद्रयान-३ एकूण ४२ दिवसांत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल. प्रक्षेपण केल्यानंतर, ते प्रथम चंद्राच्या कक्षेत पोहोचेल आणि नंतर त्याची परिक्रमा करताना उतरेल.

6. दहा हजार लोक पाहाणार चांद्रयान-३ लाँचिंग

चांद्रयान-३ मिशनचे प्रक्षेपण पाहण्यासाठी लाँच व्ह्यू गॅलरी तयार करण्यात आली आहे. यामध्ये 10 हजार लोक बसू शकतात. यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

या सर्व जागा अवघ्या साडेतीन तासात बुक झाल्या. येथे दर्शक चांद्रयान-३ चे प्रक्षेपण अगदी आरामात पाहू शकतात.

7. चांद्रयान-३ मिशनचे तीन महत्त्वाचे भाग

चांद्रयान-३ मिशनचे तीन महत्त्वाचे भाग आहेत. प्रोपल्शन, लँडर आणि रोव्हर. त्याचा एकूण खर्च 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. इस्रोच्या विविध विभागातील शेकडो शास्त्रज्ञ या मोहिमेत सहभागी आहेत.

8. चंद्रयान-३ चा रॉकेट लाँचर

चांद्रयान-3 प्रक्षेपित करणारे रॉकेट 43.5 मीटर उंच आहे. आपले चांद्रयान 'फॅट बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या LVM3-M4 मधूनच अंतराळात जाईल.

LVM3-M4

9. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणानंतर...

शास्त्रज्ञांनी सांगितले की प्रक्षेपणानंतर अगदी 16 मिनिटांनंतर रॉकेट चांद्रयान-3 ला सुमारे 179 किलोमीटर वर इजेक्ट करेल.

यानंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेभोवती ५ ते ६ वेळा फिरेल. त्यानंतर हळूहळू ते चंद्राच्या कक्षेत स्थापित केले जाईल.

यानंतर, प्रोपल्शन मॉड्यूल उच्च वेगाने चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी लँडरसह महिनाभराचा प्रवास सुरू करेल.

10. चांद्रयान-३ चंद्रावर कुठे उतरणार?

चांद्रयान-3 सुमारे 3.84 लाख किलोमीटर अंतर कापेल. चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येणार आहे. कारण चंद्राचा दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुवापेक्षा मोठा आहे. येथे पाणी असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

Crime News: प्रेम, वाद अन् क्रूर हत्या! हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आली अन् काळ बनून परतली; काळजाचा थरकाप उडवणारं हत्याकांड

GCA Premier League: दर्शन, गौरेश, फेलिक्स यांचे झुंझार प्रयत्न अखेर अपुरे; धेंपो क्लबला गतविजेत्या चौगुले संघाविरुद्ध पहिल्या डावात 149 धावांची आघाडी

IPL 2026 Points Table: टायटन्सची चालली जादू! कोलकात्याला हरवून गुजरातनं गुणतालिकेत केला उलटफेर; हैदराबाद आणि दिल्लीला फटका

SCROLL FOR NEXT