Goa College Festival Gomantak News
ब्लॉग

2 वर्षांनंतर गोव्यात ‘युवा जोश' महोत्सव, 20 महाविद्यालय येणार एकत्र

Goa College Festival: 21 मे रोजी मिनेझिस ब्रागांझा इन्ट्यिट्यूटमध्ये होणाऱ्या मुख्य महोत्सवात या ‘युवा जोश’ ने महोत्सवाचा कळस गाठलेला असेल.

दैनिक गोमन्तक

कोरोनामुळे महाविद्यालये बंद राहिली. ऑनलाईन वर्ग चालू होते. परीक्षादेखील कशाबशा पार पडल्या. परंतु विद्यार्थी आपल्या अभिव्यक्तीचे उमाळे जिथे जल्लोषाने साजरे करतात असे सांस्कृतिक महोत्सव मात्र गेली दोन वर्षे झालेच नाहीत. विद्यार्थ्यांचे हे महोत्सव केवळ नाच, गाणी आणि मनोरंजनापुरते मर्यादित नसतात. तो फक्त वरवरचा भाग असतो. मुळात हा त्यांच्या ‘स्व’चा शोध सुरू व्हायचा हा काळ असतो. आपल्याला आपल्या कौशल्याचे प्रदर्शन अटीतटीने करावयाचे आहे अशी ईर्ष्याही तिथे असते. आपल्या व्यक्तिमत्त्वाला नीट पारखण्याची आणि ओळखण्याची ही वेळ असते.

आणि या प्रकारच्या कॉलेज महोत्सवात प्रेक्षक कोण असतात तर आपलेच समवयस्क. ते रंगमंचावर तुमच्याकडून एखाद्या जोशील्या सादरीकरणाचीच अपेक्षा धरून असतात. त्यांच्यासमोर तुम्ही जिंकलात तर तुमच्या आत्मविश्‍वासाची छाती अधिक रुंदावते. पुढची वाट अधिक स्पष्ट होते. आज समाजात विविध क्षेत्रांत नेतृत्व करणारी जी मंडळी आहेत ती भलेही अभ्यासात मागे राहिलेली असतील पण सांस्कृतिक क्षेत्रात ती स्वत:ला पुढेपुढे करून उत्साहाने लुडबूड करणारी नक्कीच होती. ज्याने आपल्या ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर आपल्यामधल्या प्रतिभेची परीक्षा घेतली आहे तोच आयुष्याच्या पुढच्या संघर्षात धारधारपणे तळपलेला आहे.

या सर्व प्रकारच्या ‘व्यक्तिमत्त्व’ परीक्षांना गेली दोन वर्षे विद्यार्थी सामोरा गेलेला नाही. ‘दै. गोमन्तक’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ने यंदाचे शैक्षणिक वर्ष संपता संपता ही संधी विद्यार्थ्यांसमोर आणली आहे. या महोत्सवात रंगमंचावर वक्तृत्व स्पर्धा होतील, नृत्य स्पर्धा होतील, जाहिरातींचे कल्पक मंचीकरण होईल, गीतगायन स्पर्धा होईल. त्याचबरोबर ‘फेस पेंटींग’, ‘पोस्टर मेकिंग’सारख्या मंचबाह्य स्पर्धाही होतील. फोटोग्राफी, लघुपट, रील बनवणे, पथनाट्य वगैरे स्पर्धांच्या निमित्ताने विद्यार्थी मुख्य महोत्सवाच्या आधीच स्पर्धेच्या मूडमध्ये आलेले असतील.

21 मे रोजी मिनेझिस ब्रागांझा इन्ट्यिट्यूटमध्ये होणाऱ्या मुख्य महोत्सवात या ‘युवा जोश’ ने महोत्सवाचा कळस गाठलेला असेल. या स्पर्धेत उत्तर गोव्यातली (North Goa) दहा आणि दक्षिण गोव्यातली (South Goa) दहा मिळून एकंदर 20 महाविद्यालये (Goa College) सहभागी असतील.

साधारण 400 ते 500 विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमधून या महोत्सवाचा भाग झालेले असतील. शैक्षणिक वर्षाची अखेर असली तरी विद्यार्थी आपल्या अंतरातल्या उमींना प्रतिसाद देत या महोत्सवात भाग घेत आहेत, कारण त्यांना ही संधी दोन वर्षांच्या काळानंतर मिळत आहे.

या कोरोना काळाने (Corona) आपल्याला खूप शिकवले आहे. ज्या सांस्कृतिक आनंदाला विद्यार्थी प्रदिर्घ काळ पारखा झाला होता तो आनंद पूर्ण अंशाने पुन्हा मिळवण्याची ही यंदाची एकमेव आणि शेवटची संधी आहे. ‘युवा जोश’ हा या वर्षीचा सर्वात मोठा महाविद्यालयीन महोत्सव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT