Want to see Jupiter-Venus Conjunction? Special arrangements at these 9 places in Goa Dainik Gomantak
ब्लॉग

गुरु- शुक्र संयोग पाहायचंय? गोव्यातील या 9 ठिकाणी विशेष व्यवस्था

1 मे रोजी पहाटपूर्व काळात एकमेकांना स्पर्श करतानाचे दुर्मिळ दृश्‍य आपल्याला दिसेल.

दैनिक गोमन्तक

गोवा: रात्रीच्या आकाशातील चंद्रानंतरचे सर्वांत तेजस्वी - शुक्र आणि गुरु ग्रह, 1 मे रोजी पहाटपूर्व काळात एकमेकांना स्पर्श करतानाचे दुर्मिळ दृश्‍य आपल्याला दिसेल. -2.1 मॅग्नीट्यूडवरील गुरु ग्रह, -4.1 मॅग्निट्यूडवर असलेल्या तेजस्वी शुक्राच्या केसभर रुंदीच्या अंतरावर असेल. दोन ग्रहांनी एकमेकांच्या निकट येण्याची ही अलीकडच्या काळातली घटना असेल. जेव्हा दोन किंवा अधिक खगोलीय वस्तू, सामान्यत: ग्रह, आकाशात एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा त्याला ‘संयोग’ (कंजक्शन) असे म्हणतात.

दुर्बिणीशिवाय हा संयोग आपण पाहू शकाल. सूर्योदयाच्या सुमारे एक तास पूर्वी आग्नेय दिशेला (दक्षिण पूर्व) हा चित्तथरारक, सर्वोत्तम संयोग आपल्याला दिसेल. यावेळी आकाशात मंगळ आणि शनिग्रहांचेही स्पष्ट दर्शन होईल. पहाटे ४.३० ते ५.३० च्या दरम्यान आपल्याला हे सारं पाहता येईल. ज्यांच्यापाशी दुर्बिण आहे त्यांना दुर्बिणीच्या एकाच दृश्‍य क्षेत्रात आकाशातील दोन तेजस्वी ग्रहांचे अवलोकन करण्याची संधी लाभेल.

‘द असोसिएशन ऑफ फ्रेंन्डस ऑफ ॲस्ट्रोनोमी (गोवा)’ ने, 1 मे रोजी गोव्यात 9 विविध ठिकाणी पहाटे 4.30 ते 5.30 या काळात खगोलप्रेमींना या घटनेचा आनंद घेता यावा यासाठी विशेष दुर्बिणींची व्यवस्था केली आहे.

1) जुन्ता हाऊस पणजी

2) फातोर्डा स्टेडियम - मडगांव

3) 1930 मॉल वास्को

4) सरकारी महाविद्यालय - साखळी

5) हॅलिपॅड, बोडगेश्र्वर देवस्थान - म्हापसा

6) मल्लीकार्जुन विद्यालय - काणकोण

7) विद्याप्रबोधिनी हायस्कूल- पर्वरी

8) हरमल पंचक्रोशी हायस्कूल - हरमल

9) एन.बी. स्पोर्ट्स क्लब - मोरिडा, कुंकळ्ळी

या साऱ्या ठिकाणी वरील वेळात खगोलप्रेमींना प्रवेश खुला राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT