Summers Dainik Gomantak
ब्लॉग

सोसवत नाही हा उन्हाळा, सूर्याच्या तापाने लाहीलाही होते आहे सर्वांना...

उन्हामुळे सर्वात अधिक जाणवणारा त्रास म्हणजे डिहायड्रेशन!

दैनिक गोमन्तक

ग्रीष्म ऋतुचा सरता काळ सुरू झालेला आहे. पण उष्म्याचा प्रभाव कमी व्हायला अजून उशीर आहे. हिट स्ट्रोक, डोकेदुखी, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे (डिहायड्रेशन), घामोळे, इन्फेक्शन इत्यादी तक्रारींनी एव्हाना क्लायमॅक्स गाठलेला आहे. या साऱ्या तक्रारींवर सोपे घरगुती उपाय अवलंबणे हाच एक उत्तम पर्याय असतो.

उन्हामुळे सर्वात अधिक जाणवणारा त्रास म्हणजे डिहायड्रेशन! उष्णतेमुळे शरीरातील पाणी लघवी व घामामार्गे अधिक प्रमाणात बाहेर टाकले जाते व त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन, अतिप्रमाणात तहान लागते, डोके दुखते, उलटी होऊन थकवा येतो. घामामुळेच ग्रंथी ब्लॉक होऊन त्वचेवर पुरळ येते. त्यालाच घामोळे म्हणतात. लहान मुलांच्या घामाच्या ग्रंथी पूर्णपणे विकसित झालेल्या नसल्याकारणाने घामोळ्यांचा त्रास त्यांना अधिक होतो. घामामुळे पायांच्या बोटांच्या बेचक्यात ओलसरपणा राहून फंगस किंवा बॅक्टेरियाची वाढ होते व तिथे इन्फेक्शन होऊन ते पसरत जाते.

या सर्वावर उपाय म्हणजे पाणी (शक्यतो माठातले) थोड्या थोड्या वेळाने पित राहणे व शरीराचे तापमान प्रमाणात ठेवणे. अतिप्रमाणात घाम येणारी कामे शक्यतो टाळावीत. दिवसातून दोन-तीन वेळा अंघोळ करावी व सैलसर सुती कपडे परिधान करावेत. पायांच्या बोटातील इन्फेक्शन टाळण्यासाठी बूट घालणे शक्यतो टाळावे किंवा बूट गरजेचे असल्यास स्वच्छ सॉक्स वापरावेत. संधी मिळेल तेव्हा बूट काढून पायांना मोकळी हवा देणे चांगलेच.

मात्र या दिवसात फ्रिजमधील थंड पाणी शक्यतो टाळा कारण तेच शरीराला धोकादायक असते. त्याऐवजी माठातील शीतल पाणी आपली तहान भागवण्याबरोबरच मातीमधली पोषक खनिजद्रव्येही आपल्याला पुरवते. उन्हाळ्यात मिळणाऱ्या फळांपैकी जांभूळ हे अ‍ॅन्टीऑक्सीडेंटनी भरपूर असलेले फळ आहे. करवंदांमध्येही अ‍ॅन्टीऑक्सीडेंट असतात त्यामुळे ही फळे खाणे उत्तम. जेवणात हिरव्या कोशिंबिरी आणि कच्चा कांदा याचा समावेश अवश्य करा. शिळ्या अन्नाला मात्र जाणीवपूर्वक दूर ठेवा. जास्त तळलेले आणि मसालेदार अन्नही टाळाच.

हृदय फिट आणि स्वस्थ ठेवण्यासाठी ‘एरोबिक्स’ व्यायाम फायद्याचा आहे. भरपूर चालणे, सायकलिंग, पोहणे यासारखे व्यायाम प्रकार उन्हाळ्यात करावेत. त्यामुळे शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होते. आणि सर्वात महत्त्वाचे चांगली झोप घ्या. उन्हाळ्यात दुपारची झोप घेणे मात्र अयोग्य ठरेल. त्यापेक्षा झोपेची आणि सकाळची उठण्याची वेळ ठरवून त्याप्रमाणे झोपेला वळण लावा.उन्हाचे बाहेर पडणे टाळता येत नसेल तर गॉगल, टोपी किंवा छत्री विसरू नका.

उन्हाळा कितीही नकोसा वाटला तरी निसर्ग याच दिवसात रंगपंचमी उधळत असतो हे आपण विसरू नये. या उन्हामुळे भाजून आलेल्या मातीला, पावसाच्या पहिल्या सरीने छातीत भरून घ्यावा असा मोहक सुवास येणार आहे हे लक्षात असू द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT