World Theater Day Dainik Gomantak
ब्लॉग

रंगभूमी दिनाची पर्वणी

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त गोव्याच्या ‘थिएटर फ्लेमिंगो’ने नाट्यप्रयोग आणि ऑनलाईन नाट्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: येत्या 27 मार्च रोजी, जागतिक रंगभूमी दिनानिमित्त गोव्याच्या ‘थिएटर फ्लेमिंगो’ने नाट्यप्रयोग आणि ऑनलाईन नाट्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

‘अभिनेत्यासाठी दैनंदिन रियाज’ या विषयावर त्या दिवशी सकाळी 7 ते 8.30 या वेळात ऑनलाइन प्रात्यक्षिक सादर होईल. सायंकाळी फोंडा येथील राजीव गांधी कलामंदिरमध्ये ‘टोबा टेक सिंग’ (हिंदी), डंब इंडायजेशन (शब्द विरहित), आणि ‘हत्तमालच्या पल्याड’ (मराठी) हे तीन नाट्यप्रयोग सादर होतील. ‘टोबा टेक सिंग’ हे सोलो सादरीकरण, सादत हसन मंटो यांच्या लघुकथेवर आधारलेले आहे. विद्यानिधी वनारसे यांनी या लघुनाट्याचे दिग्दर्शन केले आहे. मंदार जोग हे या प्रयोगात भूमिका करतात.(World Theater Day)

‘डंब इंडायजेशन’ हे शारीरिक सादरीकरण आहे. केतन जाधव यांच्या संकल्पनेतून सादर होणारा हा प्रयोग त्यांनीच दिग्दर्शित केला आहे. मोदी सानप यांची भूमिका या प्रयोगात आहे.‘हत्तमालच्या पल्याड’ हा मूळ बादल सरकार यांच्या बंगाली नाटकाचा हा मराठी अनुवाद आहे. महेश खांदारे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात श्रावण फोंडेकर, प्रणव टेंगसे आणि प्राजक्ता कवळेकर यांच्या भूमिका आहेत. राजीव गांधी कला मंदिरच्या एरिना थिएटरमध्ये या तिन्ही नाटकांचे प्रयोग सायंकाळी 7.30 वाजता सुरू होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT