Painting training Dainik Gomantak
ब्लॉग

Painting Training: पेन्सिल टू पोर्टफोलिओ

प्रसिध्द चित्रकार राजेंद्र उसपकर हे या उपक्रमाचे संचालक आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Painting Training प्रत्येक शनिवारी, 3 ते 6 या दरम्यान चालणारा ‘पेन्सिल टू पोर्टफोलिओ’ हा दृश्‍य कला माध्यमासंबंधातला प्रशिक्षण उपक्रम या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होत आहे. पणजी येथील ‘सुनापरान्त- गोवा सेंटर फॉर द आर्टस’ने युवा चित्रकारांसाठी आयोजित केलेला हा उपक्रम 26 आठवडे चालेल.

प्रसिध्द चित्रकार राजेंद्र उसपकर हे या उपक्रमाचे संचालक आहेत. त्याव्यतिरिक्त स्वप्नेश वायंगणकर, विजय भंडारे, सिध्दार्थ गोसावी आणि जॉन मिनेझिस हे गोव्याचे प्रथितयश चित्रकार या उपक्रमात सहभागी कलाकारांना वैयक्तिक प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन देणार आहेत.

निरिक्षण कौशल्य विकसित करणे, चित्रकला साहित्य समजून घेणे, विश्‍लेषणात्मक दृष्टीकोन तयार करणे आणि चित्रकलेत पुढील शिक्षण घेण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी मार्गदर्शन करणे इत्यादी गोष्टी या प्रशिक्षणकाळात या उपक्रमात शिकवल्या जातील.

रेषा, आकार, अवकाश, घाट, पोत, रचना, पर्स्पेक्टिव्ह इत्यादी कलानिर्मिती प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकामार्फत शिकवल्या जातील. व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी आपला पोर्टफोलिओ कसा तयार करावा यासंबंधाने चित्रकार शिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन करण्यात येईल.

या उपक्रमाचा अभ्यासक्रमात पुढील गोष्टी समाविष्ट असतील:

  • रेखाटन आणि चित्रकला

  • रंग सिध्दांत

  • स्थिर चित्र

  • लॅण्डस्कॅप

  • मानवी आकृती

  • छायाचित्रण

  • पोर्टफोलिओ समिक्षा

  • चित्रकला प्रदर्शन

या प्रशिक्षण उपक्रमात 13 ते 18 वर्षापर्यंतची मुले सहभागी होऊ शकतात. या प्रशिक्षणासाठी आपले नावे आल्तिनो येथील सुनापरान्त सेंटर मध्ये नोंदवता येईल किंवा info.sgfa.org या इमेलवर त्यासाठी संपर्क करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT