Indian Dress  Dainik Gomantak
ब्लॉग

Fashion|स्वदेशी वस्त्रपरंपरेचे वैभव

गोव्यातील (Goa) इतर शहरातले लोक आता ‘एथनिक’ कपड्यांच्या खरेदीसाठी वास्कोच्या दिशेने वळले

दैनिक गोमन्तक

एमबीए केल्यानंतर आपल्या पहील्या नोकरीसाठी (Job) सुवीना बाणावलीकरची निवड कॅम्पसमधेच झाली. बेंगलोर इथल्या ‘फॅब इंडिया’च्या (Fab India) शाखेत मॅनेजर म्हणून निवडल्या गेलेल्या सुवीनाची ओळख तिथल्या वेगळ्या परंतू आकर्षक अशा रचनांच्या उत्पादनांकडे झाली. कपड्यांच्या ‘एथनिक’ डिझाईन्सनी तिचे लक्ष विशेष आकर्षून घेतले. आपल्या स्वदेशी आणि परंपरागत कपड्यांतही किती विविधता आणि आकर्षकता आहे हे तिच्या लक्षात आलं. सुवीना सांगते, ‘त्यापूर्वी मला साधी साडी निवडणे जमत नव्हते पण कपड्याचा दर्जा, त्यांचा पोत याविषयी मला माझ्या ‘फॅब इंडिया’तल्या त्या नोकरीच्या दरम्यान माहिती झाली.

लग्न झाल्यानंतर सुवीना पुन्हा गोव्यात परतली. वास्को (Vasco) शहरात ती आता स्थायीक झाली होती. सुवीना नेहमीच कार्यक्षम वृत्तीची होती. त्यामुळे आपली स्वतःची ओळख निर्माण व्हायला हवी अशी आकांक्षा ती नेहमीच बाळगून होती आणि त्यासाठी आपण स्वतंत्रपणे काहीतरी करायला हवे असा विचार ती नेहमीच करायची. ‘फॅब इंडिया’तल्या नोकरीमुळे ती कपड्यांच्या बाबतीत चोखंदळ बनली होती. कपड्यांसंबंधीतच एखादा व्यवसाय करावा असा विचार तिच्या मनात येत असला तरी व्यवसायासाठी लागणारा पैसा (Money) , त्यात असलेली जोखीम यामुळेही तिचे आढेवेढे सुरु असायचे. पण शेवटी तिने धाडस करुन शहरातच, एका छोट्याशा जागेत आपले ‘नारी द फॅशन हाऊस’ (Nari The Fashion House) हे बुटीक सुरु केले.

सुवीना ‘मार्केटींग आणि ह्यूमन रिसोर्स’ या विषयाची विद्यार्थीनी असल्याकारणाने आपल्या बुटीकचे नाव ठरवण्यात तिने जवळजवळ एक महीना घालवला. लोकांच्या सहज लक्षात राहील असेच नाव तिला हवे होते. शेवटी ‘नारी’ हे नाव तिला सुचले आणि ‘नारी द फॅशन हाऊस’ अस्तित्वात आले. बुटीक लहान असले तरी सुवीनाला मिळालेला प्रतिसाद फारच चांगला होता. पूर्वी अशातऱ्हेच्या कपड्याच्या खरेदीसाठी वास्कोतील लोकांना अन्य शहरात जावे लागायचे पण ‘नारी’ ने ते बदलले. गोव्यातील (Goa) इतर शहरातले लोक आता ‘एथनिक’ कपड्यांच्या खरेदीसाठी वास्कोच्या दिशेने वळले. सुवीनाने स्वतःच मॉडेल बनून सोशल-मेडीयावरुन लोकांना ‘नारी’ बद्दल माहिती दिली. पण सुवीनाच्या मते, ‘केवळ जाहीरात करुन लोकप्रियता मिळत नाही. उत्पादनाचा दर्जा आणि किंमत यातही योग्य ताळमेळ असावा लागतो. ग्राहकांना समाधान मिळाले की ग्राहकच अस्थापनाची तोंडी प्रसिध्दी करतात. आता ‘नारी’ हे नाव इतके लोकप्रिय झाले आहे की आता लोक सुवीनालादेखील तिच्या नावाने न ओळखता ‘नारी’ म्हणूनच ओळखतात.

कोविडकाळ (Corona) सुवीनासाठीदेखील अर्थातच आव्हानात्मक राहीला पण त्या दरम्यान तिने आपली वेबसाईट बनवून आपल्या उत्पादनाला राष्ट्रीय पातळीवर नेले. भारतातल्या सर्व प्रमुख शहरात आणि अन्य ठिकाणी तिने आपले नवीन ग्राहक बनवले. अन्य देशातून देखील तिला ऑर्डर मिळालेल्या आहेत त्यामुळे ‘नारी’ला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी सुवीनाचे प्रयत्न चालू आहेत.

आपली ओळख शोधता शोधता सुवीनाने भारतीय वस्त्रपरंपरेची ओळखही लोकांना आपल्या पद्धतीने करुन दिली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे लोकांनी ती आवडतेही आहे. सुवीना नावाच्या एका धडाडीचीच ही ओळख आहे. पांरपरिक वेशभूषेचा ‘नारी उत्सव’पांरपरिक वेशभूषेच्या प्रेमापोटीच सुवीनाने ‘नऊवारी’ ही थीम घेऊन गेल्या वर्षापासून ‘नारी उत्सव’ साजरा करायला सुरुवात केली. गेल्या आठवड्यातच ‘नारी उत्सव’ची दुसरी आवृत्ती शहरात पार पडली. आज ‘नऊवारी’ प्रत्येक सणासुदीसाठी स्त्रियांसाठी अत्यंत प्रिय असा वस्त्रसाज असतो. साडीला तर भारतीय वस्त्रपंरपरेत उच्च स्थान आहे हे देखील सुवीनाने, पयार्यांने ‘नारी’ने ओळखले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Ranji Trophy 2024: वाल्लोर! रणजीत गोव्याचा दमदार विजय; एक डाव, 551 धावांनी अरुणाचलवर मात

Goa CBI Raid: पणजीत लाच घेताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला CBI नं रंगेहात पकडलं

Goa News: गोव्याच्या किनारी फोटोग्राफी भोवली, बिहारच्या तरुणाकडून 25 हजार दंड वसूल; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT