फिटो अंधाराचे जाळे Dainik Gomantak
ब्लॉग

फिटो अंधाराचे जाळे

गोवा मुक्त झाल्यानंतर अजूनपर्यंतच्या प्रदीर्घ काळात ज्यांच्या घरी वीज किंवा पाणी येत नाही अशा लोकांनी समाजाकडे नाते सांगावे तरी कसे?

दैनिक गोमन्तक

एक दिवस जर घरात वीज नसेल तर जीव कसा घाबराघुबरा होतो. फ्लॅटवरचे नळाचे पाणी गेल्यानंतर खाली दहा मीटर अंतरावर असलेल्या जमिनीत बसवलेल्या टाकीतून पाणी आणण्याच्या कल्पनेनेही पाठ दुखायला सुरुवात होते. पण वीज, पाणी अशा मूलभूत हक्कांपासून पिढ्यानपिढ्या वंचित असलेल्यांचे काय? गोवा मुक्त झाल्यानंतर अजूनपर्यंतच्या प्रदीर्घ काळात ज्यांच्या घरी वीज किंवा पाणी येत नाही अशा लोकांनी समाजाकडे नाते सांगावे तरी कसे?

हल्लीच कावरे-पिर्ला पंचायतीतल्या ‘उबो फातर’ या धनगरवाड्यावरच्या घराना वीजजोडणी देण्याचे सरकारने ठरवण्याचे सर्वांना वर्तमानपत्रांतून कळले. आणि यासाठी खर्च किती येणार आहेत तर सुमारे 33 लाख रुपये! ही 33 लाख रुपयांची दानत आमच्या व्यवस्थेमध्ये जागी होण्यासाठी गोव्याचा साठावा मुक्तिदिन जवळ यावा लागला.

वीज खात्यातील अधिकाऱ्यांनुसार येत्या दिवाळीपर्यंत त्यांच्या घरात विजेचा प्रकाश येऊ शकेल. तसे प्रयत्न चालू आहेत. अगदी उशिरा म्हणजे ख्रिसमसपर्यंत तरी हे काम पूर्ण होईल. तिथल्या जंगलसदृश क्षेत्रात सुमारे शंभर लोक राहतात. मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर आत असलेल्या या जागेत वीज नेण्यासाठी सुमारे पन्नास सिमेंटचे खांब लागतील. दोन ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता असेल. या भागात पोचण्यासाठी गाडी जाऊ शकेल असा रस्ता अजून नाही ही मोठी अडचण आहे.

सारा जन्म वीज आणि पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचित राहून काढला त्यांना या वेळी वीज खात्याची माणसे तिथे सर्वेसाठी पोहोचली तेव्हा काय वाटले असेल? आतापर्यंत त्यांनी बरीच निवेदने वीज खात्याला दिली होती. यापूर्वीही कधीतरी त्यांना वीज पुरवठ्याचे आश्वासन मिळाले असावे कारण त्यांनी आपल्या घरात विजेचे वायरिंग दोन वर्षांपूर्वीच बसवून घेतलेले आहे. पाच वर्षांपूर्वी सोलर ऊर्जेची व्यवस्था या भागात केली गेली होती. पण ती कधीच बंद पडलेली आहे. पण आता हालचाल सुरू झाली आहे. आदीम अवस्थेत असलेले त्यांचे दैनंदिन जीवन या दिवाळी-ख्रिसमसपर्यंत उजळून जावो इतकीच अपेक्षा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT