Serendipity Arts Festival Dainik Gomantak
ब्लॉग

Serendipity Arts Festival : सेरेंडिपिटी आर्टस् रेसिडेन्सीला प्रारंभ    

वातावरण तयार करणे आणि त्यांना संसाधने प्रदान करणे हे या रेसिडेन्सीचे उद्दिष्ट आहे. या निवासी कार्यक्रमाचे आयोजन ‘फ़्रेंच इन्स्टिटयूट इन इंडिया’ सोबत करण्यात आले आहे आणि रेसिडेन्सीच्या ह्या ६ व्या आवृत्तीत फ़्रेंच कलाकारांचाही समावेश आहे.

Dainik Gomantak

सेरेंडिपिटी आर्टस् फेस्टिव्हलने आपल्या 2023-24 च्या 'सेरेंडिपिटी आर्टस् रेसिडेन्स’साठी कलाकारांची निवड करून त्यांच्या प्रशिक्षणाला 3 जुलैपासून सुरुवात केली आहे. सेरेंडीपिटीची ही रेसिडेन्सी गेल्या सहा वर्षांपासून तरुण कलाकारांसाठी एक सक्षम व्यासपीठ बनली आहे. या योजनेद्वारे सेरेंडीपिटी देशातील उत्कृष्ट कलाकारांना त्यांची कला विकसित करण्यास आणि प्रेक्षकांसमोर येण्यास संधी देते.    

एप्रिलमध्ये सुरु झालेल्या या निवडप्रक्रीयेतून संगीत, नृत्य, नाट्य, दृश्य माध्यम तसेच इतर नवीन माध्यमात काम करणर्या उत्कृष्ट कलाकारांना निवडण्यात आले आहे. त्यांच्या सरावासाठी, नवीन प्रकल्पांवर काम करण्यासाठी आणि व्यापक कलासमुदायाशी संलग्न राहण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे आणि त्यांना संसाधने प्रदान करणे हे या रेसिडेन्सीचे उद्दिष्ट आहे. या निवासी कार्यक्रमाचे आयोजन ‘फ़्रेंच इन्स्टिटयूट इन इंडिया’ सोबत करण्यात आले आहे आणि रेसिडेन्सीच्या ह्या 6 व्या आवृत्तीत फ़्रेंच कलाकारांचाही समावेश आहे.

रेसिडेन्सीसाठी कलाकारांची निवड तज्ञ ज्युरी पॅनेलद्वारे करण्यात आली. विक्रम लिंगर, संचयन घोष, सुमंगला दामोदरन, संदीप संगारू,सहेज राहाल या दिग्गज मंडळींचा समावेश ज्युरींमध्ये होता. रेसिडेन्सीमध्ये निवडले गेलेले कलाकार संवाद, विश्लेषणात्मक सत्रे, गॅलरी आणि स्टुडिओ भेटी, सादरीकरण, मास्टरक्लास, कार्यशाळा, चर्चा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होतील. ही रेसिडेन्सी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल.

रिचा आर्या

रिचा हरियाणातील शिल्पकार आहे. तिच्या शिल्पांचे प्रदर्शन संपूर्ण भारतात होत असते. शिल्पकला या माध्यमात लक्ष केंद्रित करून व त्यात आपली प्रतिभा आणि समर्पण दाखवून अनेक एकल आणि सामूहिक प्रदर्शनाद्वारे तिने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पेल ब्लु डॉटर ऊर्फ सुरभी मित्तल 

संगीताला आपल्या कलेत स्थान देऊन सुरभी अद्भूत निर्मिती करते. पॉलीन ऑलिव्हरोस आणि मॉड्यूलर सिंथ डिझाइनपासून प्रेरणा घेऊन तसेच इंटरवेव्हिंग मेलडी, बोलले जाणारे शब्द आणि फील्ड रेकॉर्डिंग यातून तिने निर्माण केलेले ध्वनी आणि इन्स्टॉलेशन अद्वितीय असतात.

मॅसांज सनागो 

मॅसांज ही फ्रान्समधील बहुविद्याशाखीय कलाकार आहे. अभिनय, लेखन, दिगदर्शन, छायाचित्रण आणि व्हिडीओ हे तिच्या सर्जनशीलतेचे क्षेत्र आहे. आफ्रो-वंशीयांवर लक्ष केंद्रित करून भेदभाव आणि स्व-ओळख यासंबंधी ती कार्य करते.

दिलीप चिलंका

केरळमधील दिलीप एक उत्कृष्ट कलाकार आहे. तो अभिनेता, नर्तक, कोरिओग्राफर आणि नाट्य दिग्दर्शक आहे. चिलंका थिएटर लॅबचा संस्थापक असलेल्या दिलीपने भारत आणि परदेशातील नामवंत थिएटर अभ्यासकांसोबत काम केले आहे.

सलमान बाबा

सलमान हा श्रीनगरमधील एक दृश्य माध्यमातील कलाकार आहे. काश्मिरी लँडस्केप आणि विषय त्याच्या चित्रांचे भाग असतात. हिंसा, स्मृती आणि अंवकाश यातून तो आपल्या निर्मितींना आकार देतो. वास्तव आणि कल्पना यांची सरमिसळ त्याच्या रेखाटनात आढळते..

शिवानी कसुमरा

शिवानी ही नवी दिल्लीतील संशोधक आणि लेखिका आहे, कला आणि दृश्य संस्कृतीचा इतिहास हा तिच्या संशोधनाचा विषय आहे. समकालीन कलेतील संशयीत पद्धतींवर विशेष लक्ष केंद्रित करून समिक्षात्मक, बौद्धिक इतिहास आणि द्रश्य अभ्यास या संबंधात तिचे काम चालते.

सेवाली डेका

सेवालीच्या कलेतून ग्रामीण जीवन, देशी खाद्यसंस्कृती आणि पारंपरिक शेतीपद्धती प्रतिबिंबित होते. चित्रपट आणि छायाचित्रण यांसारख्या प्रायोगिक माध्यमांना स्थानिक तंत्रांची जोड देऊन शेतकरी आणि कारागीर यांच्या सामूहिक भावनांना साजरी करणारी आकर्षक कलाकृती सेवाली निर्माण करते..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT