यंदा एकाच वर्षात घडलेल्या दोन इफ्फी रोचक अनुभव Dainik Gomantak
ब्लॉग

यंदा एकाच वर्षात घडलेल्या दोन इफ्फीचे रोचक अनुभव

गेली एकोणचाळीस वर्षे सातत्याने इफ्फीला (IFFI) हजेरी लावणाऱ्या सतिंदर मोहन यांनी टिपलेली यावर्षीची वैशिष्ट्ये...

दैनिक गोमन्तक

52 वा इफ्फी (IFFI) काल आटोपला. यापूर्वी कधीच न घडलेल्या अनेक गोष्टी यंदाच्या इफ्फीत (IFFI) अनुभवायला मिळाल्या. यात बऱ्या-वाईटांचे मिश्रण होतेच पण गेली एकोणचाळीस वर्षे सातत्याने इफ्फीला (IFFI) हजेरी लावणाऱ्या सतिंदर मोहन यांनी टिपलेली यावर्षीची वैशिष्ट्ये...

‘यंदा पहिल्यांदाच इफ्फीच्या (IFFI) उद्घाटन सोहळ्याला धुवाधार पावसाने (Rain) हजेरी लावली. आतापर्यंत मी पाहिलेल्या 39 इफ्फीत (IFFI) पाऊस हा असा पाहुणा बनून आल्याचं मला कधीच आठवत नाही.’‘यंदा या एकाच वर्षात दोन इफ्फी (IFFI) अनुभवायला मिळाल्या: 51 वा इफ्फी (IFFI) याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात तर 52 इफ्फी (IFFI) नोव्हेंबर महिन्यात. असं हे पहिल्यांदाच घडत होतं.’

‘75 प्रतिभाशाली युवा सिनेकर्मींचा शोध 52 व्या इफ्फीच्या (IFFI) निमित्ताने घेण्यात आला. हा नवीन प्रयोग होता. या युवा सिनेकर्मींवरआपण पुढील दहा वर्षे लक्ष ठेवणार आहे असे आश्वासनही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी दिले आहे.’‘बीआरआयसीएस (ब्रिक्स) फिल्मचे (Film) प्रदर्शनही इफ्फीत (IFFI) पहिल्यांदाच घडले. अन्यथा हा वेगळा चित्रपट महोत्सव असयचा.’

‘इफ्फीत (IFFI) देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराला यंदापासुना भारताचे (India) श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांचे नाव देण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच हा पुरस्कार चित्रपट क्षेत्रातल्या दोन दिग्गजांना देण्यात आला. यापूर्वी दरवर्षी तो एकालाच देण्यात येत होता.’‘इंडियन पॅनोरामा’ (Indian Panorama) या विभागात असलेल्या चौवीस चित्रपटांपैकी, बारा चित्रपट (Movie) हे त्या दिग्दर्शकांचे प्रथम चित्रपट (Movie) होते. दिमसा, गढवाली या भाषात बनवलेल्या चित्रपटांचा(Movie) समावेश इफ्फीच्या (IFFI) ‘इंडियन पॅनोरामा’ (Indian Panorama) विभागात प्रथमच झाला. त्यापैकी ‘सेमखोर’ हा दिमसा भाषेतला चित्रपट ‘इंडियन पॅनोरामा’ (Indian Panorama) उद्घाटनाचा चित्रपट (Movie) होता. ‘सुनपट’ हा गढवाली लघुपट ‘डेब्यू’ गटात समाविष्ट होता. ‘तलेदण्ड’, पॅनोरामा (Panorama) विभागात दाखवला जाणारा पहिला कन्नड ‘डेब्यू’ चित्रपट होता.’‘एखाद्या दक्षिणात्य अभिनेत्रीला, समंथा (Samantha) यांना, प्रथमच इफ्फीत (IFFI) वक्ता म्हणून स्थान मिळाले.’‘यंदाच्या इफ्फीत (IFFI) नव्याची नवलाई ही अशी होती.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT