Ricardo Martins Dainik Gomantak
ब्लॉग

रिकार्डो मार्टिन्स याचे गिटारवादन

रिकार्डो मार्टिन्स हा पोर्तुगीज गिटार वादकांच्या नवीन पिढीचा एक प्रभावी हिस्सा आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ricardo Martins रविवार, 11 जून रोजी सायंकाळी 6 वाजता सुप्रसिद्‍ध पोर्तुगीज गिटारवादक रिकार्डो मार्टिन्स याचे गिटारवादन ऐकण्याची संधी रसीकांना लाभणार आहे.

पोर्तुगल आणि पोर्तुगीज समुदाय दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन गोव्यातील पोर्तुगीज दुतावास आणि कोमाईश- सेंट्रो दी लिंग्वा पोर्तुगीजा यांनी मिळून केले आहे. कांपाल येथील इएसजीच्या मॅकेनिझ पॅलेसमध्ये हा कार्यक्रम सादर होईल.

रिकार्डो मार्टिन्सबद्दल असे लिहिले आहे- ‘लिस्बन आणि कोईम्ब्रा गिटारवर प्रभुत्व असलेला रिकार्डो, या दोन्ही प्रकारच्या गिटारमधून, त्याच्या शुचीपूर्ण प्रतिभेच्या सामर्थ्यांने स्वप्न सदृश्य ध्वनीची निर्मिती करतो.’

रिकार्डो हा आजच्या काळातला पोर्तुगलचा महान संगीतकारांपैकी एक मानला जातो. आपल्या प्रतिभेने त्याने पोर्तुगीज गिटार वादनाला उंचीवर नेण्यासाठी अनेक कलात्मक मार्ग शोधले. २०१७ मधील ‘कँटोस ई लॅमेंटोस’ हा अल्बम तयार करताना त्याने पोर्तुगीज गिटार परंपरेचे सारे मापक पाळले.

पारंपारिक पोर्तुगीज तसेच शास्त्रीय संगीत याचा प्रभाव असूनही त्याच्या संगीतावर त्याचा अनोखा असा वैयक्तिक ठसा जाणवतो. रिकार्डो मार्टिन्स हा पोर्तुगीज गिटार वादकांच्या नवीन पिढीचा एक प्रभावी हिस्सा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT