Vivekananda Environment Awareness Team Dainik Gomantak
ब्लॉग

Plastic Waste: ही युद्धसदृश परिस्थिती आहे

लोक इतके आळशी आहेत की निर्माण होणाऱ्या कचऱ्याची जबाबदारी घेण्यास त्यांचा नकार असतो

गोमन्तक डिजिटल टीम

आसावरी कुलकर्णी

शेत, जंगल, नाले, डोंगर, नद्या आणि रस्त्यांच्या काठावर पसरून असलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याकडे नजर टाकल्यास, या धोक्याबरोबर गोवा खरोखरच लढतो आहे का अशी शंका मनात येते.

40 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या किंवा एकल वापराच्या (सिंगर युज) प्लास्टिकवर बंदी घालण्यात आघाडीवर असल्याचा आपण दावा करतो पण  ती कारवाई प्रत्यक्षात मात्र  फक्त कागदावरच असलेली दिसते.

आजूबाजूला नजर टाकल्यास सर्वत्र कचऱ्याचे सामाज्य आपल्या दृष्टीला येते आणि त्यापैकी अधिकांशचा कचरा हा एकल- वापर प्लास्टिकचा असतो. नागरिक म्हणून प्लास्टिकच्या वापराविरुध्द आपण आपले दायित्व पाळत आहोत का?

युनायटेड नेशन्स (युनो) नुसार जगात ४० कोटी टन प्लास्टिक कचरा दरवर्षी निर्माण होतो त्यापैकी अर्धा एकल- वापर प्लास्टिकचा असतो, जो शेवटी आपल्या नद्या, समुद्र आणि डोंगर दऱ्यात जमा होतो.

संशोधनातून हे दिसून आले आहे की श्‍वासोच्छवास, अन्न आणि पाण्याद्वारे मायक्रोप्लास्टिकने मानवी रक्तप्रवाहात कधीच प्रवेश केला आहे. विविध कायदे आणि दंडात्मक योजना लागू करूनही हे पर्यटकप्रिय राज्य सुमारे ८ मेट्रीक टन प्लास्टिकचा कचरा समुद्रात सोडते.

राष्ट्रीय सरासरीपेक्षा गोव्याची प्लास्टिक कचरा निर्मिती ८ पटीने अधिक आहे. प्रति व्यक्ती, प्रति दिन ६१.२ ग्रॅम कचरा निर्माण करण्याची गोव्याची क्षमता निश्‍चितच धोकादायक आहे.

अनेक ग्रामपंचायती यशस्वीपणे घरोघरीचा कचरा गोळा करतात मात्र सार्वजनिक ठिकाणे, वारसास्थळे, खारफुटी, नद्या आणि वनक्षेत्रांकडे मात्र आपले दुर्लक्ष होत आहे.

विवेकानंद पर्यावरण जागृती फौज जंगल क्षेत्र आणि नदीकाठचा कचरा साफ करण्याची मोहीम दरवर्षी हातात घेते. त्यांचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदेनी माहिती देताना सांगितले,

‘‘यावर्षी ‘म्होवाचो गुणो’ या ठिकाणी, तिथल्या म्हादई नदीच्या काठावरून आम्ही सुमारे ५० पिशव्या भरून कचरा गोळा केला, ज्यात प्लास्टिक आणि फुटलेल्या काचांचा भरणा प्रामुख्याने होता.”

श्रध्दा रांगणेकर, ‘सॉर्ट स्मॉल टू मेक बिग डिफरन्स’ ही प्लास्टिक संकलन मोहीम राबवतात. त्या सांगतात, ‘मी गेली दीड वर्षे कचरा गोळा करते आहे.

पण लोक इतके आळशी आहेत की निर्माण होणाऱ्या कचऱ्याची जबाबदारी घेण्यास त्यांचा नकार असतो आणि या प्लास्टिक प्रदूषणासाठी ते दोष मात्र नगरपालिकेला देत राहतात.’

निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गोव्याला भेट देणारे पर्यटकही कचरा विल्हेवाटीसाठी, तिथल्या जागांवर असणाऱ्या सुविधांकडे दुर्लक्ष करून अन्य ठिकाणी कचरा फेकताना दिसतात. जय बहादूर हे दोनापावला जेटीवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.

ते सांगतात, ‘प्लास्टिक स्वैर फेकण्यापासून परावृत्त करण्यासाठी केलेल्या इशाऱ्यांकडे लोक दुर्लक्षच करतात. अशा मुद्यावरुन तरुण पर्यटक गटांबरोबर मारामारीचा संभवच अधिक असल्यामुळे गप्प राहण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नसतो.’

गावोगांवच्या पर्यावरणप्रेमींची हीच कैफियत आहे की लोक त्यांच्या गावात निसर्गाचा आनंद घेण्यास येतात, पण जाताना कचरा सोडून जातात. हा कचरा नंतर तिथले ओढे-नाले आणि वनामधील पर्यावरणाला प्रदूषित करत राहतो.

सोनाळ गावातील रामा गावकर सांगतात की, प्लास्टिकच्या होणाऱ्या प्रदूषणामुळे त्यांनी ‘म्होवाचो गुणो’ या भागात पर्यटकांना जाण्यासाठी मनाई केली आहे.

खरेच आहे- प्लास्टिक प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी युध्दसदृश तयारीचीच आता गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT