गोव्याला फुलपाखरांची नैसर्गिक देणगी

 

Dainiki Gomantak 

ब्लॉग

गोव्याला फुलपाखरांची नैसर्गिक देणगी

‘मलबार ट्री निम्फ’ (Malabar Tree Nymph) या फुलपाखराची निवड गोव्याचे राज्य फुलपाखरू (Butterfly) म्हणून करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

गोव्यात (Goa) 254 वेगवेगळ्या जातीच्या फुलपाखरांची नोंद झालेली आहे. गोव्याचा समावेश असलेल्या पश्‍चिम घाट क्षेत्रात जवळ जवळ 300 प्रकारची फुलपाखरे (Butterfly) आढळून येतात. त्यातली काही स्थानिक असली तरी उर्वरित पूर्ण भारतात (India) आढळतात. गोवा लहानसा भूप्रदेश असला तरी गोव्यात आढळणाऱ्या फुलपाखरांमागे आपण खेळायचे ठरवले तर हरदिनी नव-नवीन प्रजाती आपल्याला आनंदित करतील.

गोव्याच्या (Goa) तज्ज्ञांकडून, पर्यावरणप्रेमींकडून मिळालेल्या कौलानुसार ‘मलबार ट्री निम्फ’ या फुलपाखराची निवड गोव्याचे राज्य फुलपाखरू म्हणून करण्यात आली. हिरव्यागार क्षेत्रात वर्षभर आढळणाऱ्या या फुलपाखरांच्या पंखाची रुंदी 12.0 ते 15.4 सेंटीमीटरपर्यंत भरते. कमांडर, क्लिपर, कॉमन जेझबेल आणि ब्लू-ऑिक्लफ ही इतर चार फुलपाखरे या स्पर्धेत होती. वेगळेपण, स्थानिकता, पर्यावरणीय स्थान, सौंदर्यशास्त्रीय रचना, संवर्धनीय गुणधर्म इत्यादी निकष लक्षात घेऊन या फुलपाखरांची निवड करण्यात आली.

पर्यावरण (Environment) मित्र गजानन शेटये म्हणतात, स्पर्धेत ही पाच फुलपाखरे असली तरी गोव्यात आढळणाऱ्या देखण्या फुलपाखरांमध्ये ‘ब्ल्यु टायगर’, ‘मॅप बटरफ्लाय’, ‘मलबार बेेंडेड पिकॉक’, ‘पॅरिस पिकॉक बटरफ्लाय’ यांचे स्थान देखील लोकप्रियतेत कमी नाही.

फुलपाखरांचे जीवनचक्र

फुलपाखरू आपली इवली इवली अंडी झाडांच्या पानांवर घालतात. त्या अंड्यांमधून अळी बाहेर येऊन त्या पानांवरच आपले पोषण करतात. अळी वाढवून पुढे त्याचे सुरवंट बनते. हा सुरवंट आपली वाढ पूर्ण झाल्यानंतर आपल्या भोवती एक कोष विणून घेतो. या कोषात सुरवंट आणि निसर्ग मिळून काय अद्भुत जादू करतात ते कळत नाही मात्र जेव्हा त्या कोषातून सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरू बाहेर येते तेव्हा त्या निसर्गाचे ते पांग अनावर होऊन डोळे आनंदाने त्या फुलपाखरांबरोबरच भिरभिरतात. गोव्याचे राज्य फुलपाखरू बनलेल्या मलबार ट्री निम्फच्या (Malabar Tree Nymph) जीवन चक्रामधली अंडी, सुरवंट, कोष आणि फुलपाखरू ही चारही रूपे अतिशय देखणी असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT