Instrumentalist Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्यात 16 जुलैपासून वाद्यसंगीत संमेलन

वाद्यसंगीताला वाहिलेले हे गोव्यातील एकमेव संमेलन आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

कॅमरून क्रिएशन’चे स्व. मनोहर मडगावकर स्मृती 14 वे वाद्यसंगीत संमेलन, यंदा रविवार 16 जुलै रोजी संध्याकाळी 4 वाजल्यापासून, बार्देश मधील पालये- उसकईच्या कॅमरून किंगडम हॉलमध्ये रंगणार आहे. वाद्यसंगीताला वाहिलेले हे गोव्यातील एकमेव संमेलन आहे. वाद्यसंगीताची साधना करणाऱ्या होतकरू कलाकारांना या संमेलनाद्वारे व्यासपीठ मिळते.

या संमेलनात नामवंत संतुरवादक डॉ. नरेश मडगावकर यांचे सेक्साफोनवर शास्त्रीय वादन ऐकण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. त्यांचे शिष्य श्रद्धेय मयेकर संतूरवादन करतील. बाल कलाकार आदित्य मडगावकर हा शास्त्रीय गिटारवादन सादर करणार आहे. शिवाय या संमेलनात सृजन भटकुर्से यांचे हार्मोनियम सोलोवादन व रघुवीर फडते यांचे सतारवादन होईल. डॉ. राजेश भटकुर्से, डॉ.सतीश मडगावकर, मृणाल परब, महेंद्र च्यारी हे तबलासाथ देतील. नेहा उपाध्ये यांचे सूत्रसंचालन या संमेलनात असेल. या संमेलनातील कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत.

या वाद्यसंगीत संमेलनात संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ तबलावादक नितीन कोरगावकर याना मनोहर मडगावकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार,पर्वरीच्या ज्ञान विकास विद्यालयाचे प्रशासक गौतम खरंगटे यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मनोहर मडगावकर स्मृती समाजभूषण पुरस्कार व किशोर नाईक गावकर यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल, मनोहर मडगावकर  स्मृती समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT