Church priests washing the feet of twelve peoples Dainik Gomantak
ब्लॉग

कार्निवलची मौज संपताच ‘लेंट’ची एन्ट्री

या पवित्र आठवड्यातला गुरुवार हा ‘मॉन्डी थर्सडे’ असतो.

दैनिक गोमन्तक

कार्निवलची मौज-मजा संपल्यानंतर लगेच ‘लेंट’ येतो. या महिन्यात अनेक ख्रिश्चन बांधव मांस-मदिरा वर्ज्य करतात. हे एक प्रकारे हिंदूंचे श्रावण पाळण्यासारखेच असते. श्रावण सुरू होण्याआधी गटारी अमावस्येच्या दिवशी सारी मौजमजा उरकली जाते आणि नंतर पुढचा संबंध महिना शाकाहारी बनून श्रावण पाळला जातो.

‘लेंट’ चा शेवटचा आठवडा हा ‘पवित्र आठवडा’ (होली वीक) मानला जातो. पाम संडेने सुरू होणारा हा आठवडा ‘ईस्टर’ने समाप्त होतो. गेल्या रविवारी ‘पाम संडे’ साजरा झाला. येत्या रविवारी ‘इस्टर’ साजरा होईल. खरं तर, जसं समजलं जातं तसं ‘ख्रिसमस’ हा ख्रिश्चनिटीतला महत्त्वाचा सण नसून ‘ईस्टर’ हा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले होते असे मानण्यात येते.

या पवित्र आठवड्यातला गुरुवार हा ‘मॉन्डी थर्सडे’ (कोकणीत- निमणो बेरेस्तार) असतो. गोव्याच्या चर्चमध्ये ‘लास्ट सपर’चे या दिवशी विधिवत सादरीकरण होते. या विधीत चर्चचे प्रिस्ट, त्या दिवशीच्या प्रार्थनासभेमध्ये (हाय मास) बारा जणांचे पाय धुतात. हे बारा जण ख्रिस्ताचे बारा अनुयायी असे मानले जाते.

पुढचा दिवस हा ‘गुड फ्रायडे’ (कोकणीत- निमणो शुक्रार) असतो. या दिवशी ख्रिस्ताला क्रुसावर टांगण्याचे विधिनाट्य चर्चमध्ये केले जाते. चर्चमध्ये असलेले ख्रिस्ताचे शिल्प काळ्या कापडाने झाकलेले असते. या विधिनाट्यात भाग घेणाऱ्या चर्चसदस्यांनी यावेळी लाल-पांढरा झगा (ऑपमुर्स) पांघरलेला असतो. यातला ‘मुर्स’ हा लाल कपड्याचा भाग ते डोक्यावर ओढून घेतात.

चर्चमध्ये जाणारे भक्त प्रथम कापडाने झाकून ठेवलेल्या ख्रिस्तासमोर आपला भक्तिभाव प्रकट करतात. त्यानंतर प्रार्थनेला सुरुवात होते. प्रार्थनेच्यावेळी होणाऱ्या सर्मन (उपदेश)च्या दरम्यान ख्रिस्तासमोरचा काळा कपडा हळूहळू दूर केला जातो. दोन धर्मोपदेशक वर चढून क्रुसावरच्या ख्रिस्ताला खाली असलेल्या शवपेटीत ठेवतात. ही त्या दुर्दैवी दिवसाची आठवण असते, ज्या दिवशी ख्रिस्ताला क्रुसावर टाकण्यात आले. चर्चमधली प्रार्थनासभा संपल्यानंतर ख्रिस्ताच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते. मेरीची प्रतिमाही या मिरवणुकीत साथ करते. या दिवशी साठ वर्षे वयाखालील ख्रिश्चन बांधव कडक उपास पाळतात.

आदल्या गुरुवारी, संध्याकाळपासून चर्चमधल्या घंटा वाजवणे बंद झालेले असते. ह्या घंटा इस्टरच्या मध्यरात्री, ख्रिस्ताचे पुनरुत्थान घोषित झाल्यावरच वाजतात.

‘गुड फ्रायडे’ नंतरचा दिवस ‘होली सॅटर्डे’ (पवित्र शनिवार) असतो. गोव्यात या दिवशी चर्चमध्ये प्रार्थनासभा होत नाहीत पण रात्री अकरा वाजता ‘पास्कल विजील’ हा विधी होतो. त्यानंतर त्याच रात्री बारा वाजल्यानंतर ख्रिस्ताचे पुनरुत्थान घोषित होते आणि घंटांचा निनाद सुरू होतो. पुढचा दिवस (रविवार) हा आनंदाचा ‘ईस्टर’ असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT