Jyotsna Bhole  Dainik Gomantak
ब्लॉग

Jyotsna Bhole : रंगदामिनी

Jyotsna Bhole : ‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेच्या आंधळ्यांची शाळा या नाटकातील ‘बिंबा’ ही ज्योत्स्नाबाईंची रंगमंचावरील पहिलीच भूमिका खूप गाजली.

गोमन्तक डिजिटल टीम

आसावरी कुलकर्णी

तारका शोधण्याचा हा प्रवास अतिशय रंजक अश्या वळणावर पोहचलेला आहे. काही ज्ञात काही अज्ञात अश्या या तारका विषयी माहिती गोळा करणे हा एक आगळा छंद होऊन बसलेला आहे. मग पहिल्या कोण, दुसऱ्या कोण, त्यांचा ठावठिकाणा काय? माहिती कुठे मिळेल असे प्रश्न एकत्र करून एक प्रश्नावलीच तयार झाली आहे.

आजच्या तारका या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आहेत. खरतर मराठी रंगभूमीवरील पहिल्या स्त्री कलाकारांपैकी एक अशी त्यांची ख्याती आहे. त्यापूर्वी हिराबाई बडोदेकर यांनी स्त्रींनाट्यकलाकारांची संस्था बनवली होती. परंतु आंधळ्यांची शाळा या तत्कालीन कालखंडातील एका पुरोगामी विषयावरील नाटकात काम करून रंगभूमीवर स्त्री कलाकारांचा प्रवेश सुकर केला होता. या जेष्ठ स्त्री कलाकार म्हणजे ज्योत्स्ना भोळे.

पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळकर. बांदिवडे राधाबाई केळेकर यांच्या १४ अपत्या पैकी एक असलेल्या ज्योत्स्ना बाईंना लहानपणा पासूनच संगीताची आवड होती. त्यांच्या जेष्ठ भगिनी गिरीजाताई केळेकर याही प्रख्यात गायिका होत्या. गावातील देवळात भरणाऱ्या शाळेत इयत्ता दुसरी पर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर गिरीजाताई आणि ज्योत्स्नाताई मुंबईला गेल्या. चौथी पर्यंत औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी शिक्षण थांबवले कारण त्यांना सांगीतात आवड होती.

खां यांच्या कडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. पुढे एका कार्यक्रमात झालेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन या खाजगी आकाशवाणी केंद्रावर गाण्याची संधी मिळाली. भावगीतांचे शिक्षक म्हणून लाभलेल्या केशवराव भोळे यांच्याशी त्यांचा अठराव्या वर्षी विवाह झाला. यानंतर त्यांनी संत सखू चित्रपटात सखूची भूमिका केली. याच चित्रपटापासून त्यांचे मूळचे दुर्गा हे नाव बदलून ज्योत्स्ना ठेवण्यात आले.

‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेच्या आंधळ्यांची शाळा या नाटकातील ‘बिंबा’ ही ज्योत्स्नाबाईंची रंगमंचावरील पहिलीच भूमिका खूप गाजली. या नाटकाचे दिग्दर्शन केशवराव दाते यांनी आणि संगीतदिग्दर्शन केशवराव भोळे यांनी केले होते.या नाटकाने स्त्री कलाकारांच्या नाट्यरंगभूमीवरील स्त्री कलाकारांचा वावर सुरू केल्या. स्त्री भूमिका या स्त्रियांनीच केल्या पाहिजेत अशी ठाम भूमिका या नाटकाद्वारे घेण्यात आली.

या नाटकातील ज्योत्स्नाबाईंनी गायलेले ‘एकलेपणाची आग लागली हृदया’ हे गाणे गाजले. त्यानंतर आलेल्या या संस्थेच्या लपंडाव या नाटकात त्यांनी उषेची भूमिका केली. यानंतर त्यांनी मो. ग. रांगणेकरांच्या सुवर्णमंदिर या चित्रपटातही काम केले. रंगभूमीवर त्यांच्या अनेक भूमिकाही गाजल्या.‘यंग इंडिया’ या ध्वनिमुद्रिका कंपनीने त्यांनी गायलेल्या ‘पहा गोकुळी रंगल्या गोपबाला’, ‘आणीन भूवरी नंदनवन’, ‘आला खुशीत समिंदर’, ‘दीप मावळला’ इत्यादी गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. ही गाणी त्यावेळी खूप लोकप्रिय झाली.

त्यांचा दर्द भरा आवाज आणि अभिनय यांच्या जोरावर त्यांना मोठी कारकीर्द लाभली. इंडिया पीस कौन्सिल तर्फे विविध देशात जाऊन कार्यक्रम सादर करण्याची संधी त्यांना मिळाली. या कार्याबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले. कारकीर्द आणि संसार यांचा सुरेख ताळमेळ तयांनी बसविला होता.कोकणी आणि मराठी रंगभूमीवरील पहिल्या स्त्री कलाकार या गोवेकर होत्या हे सांगताना उर भरून येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा प्राणघातक हल्ला, 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी; काणकोणातील धक्कादायक घटनेने खळबळ

Labh Drishti Yog 2026: शुक्र-शनीचा 'लाभ दृष्टी योग'! 15 जानेवारीपासून पालटणार 'या' 5 राशींचे नशीब; धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT