Jit Arolkar  Dainik Gomantak
ब्लॉग

Jit Arolkar : मांद्रे मतदारसंघात लवकरच रवींद्र भवन

आरोलकर : जागा पाहणीनंतर प्रक्रिया

गोमन्तक डिजिटल टीम

Morjim : पेडणे तालुका ही कलाकारांची खाण असल्याचे लोकप्रतिनिधींकडून वारंवार सांगितले जाते. परंतु या कलावंतांसाठी हक्काचे कला भवन आजवर तालुक्यात उभारले गेले नाही. कलाकारांना कला सादर करण्यासाठी किंवा प्रशिक्षण घेण्यासाठी साखळी, मडगाव, पणजी सारख्या दूरच्या ठिकाणी जावे लागते.

यावर उपाय म्हणून सरकारने मांद्रेत कला भवन उभारण्याची घोषणा केली. परंतु कार्यवाही रखडली आहे. लवकरच या कलाभवनाची पायाभरणीही होईल, असा विश्वास आमदार जीत आरोलकर यांनी नुकताच व्यक्त केला आहे.

पेडणे तालुक्याने आज पर्यंत राज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री सभापती उपसभापती दिले, मात्र एकालाही तालुक्यात कला भवन उभारता आले नाही. पेडण्यातील कलाकार राज्यच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही चमकत असल्याचे चित्र दिसून येते.

पेडणे तालुक्यातील प्रत्येक घरात निदान एकही व्यक्ती अशी भेटणार नाही, ज्याने चेहऱ्याला रंग फासला नाही आणि रंगभूमीवर कला सादर केली नाही. कला, नाट्य, वेशभूषा, रंगभूषा, चित्रकला, हस्तकला कारागीर, गवंडीकाम करणारे कलाकार, बांबू पासून वेगवेगळे साहित्य बनवणारे कलाकार, विविध मूर्ती साकारणारे कलाकार अशा नानाविध कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झालेले नाही.

गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मांद्रे मतदारसंघात कला भवन तथा रवींद्र भवन उभारण्याची घोषणा झालेली आहे. हे रवींद्र भवन उभारताना सर्वसामान्य कलाकारांचा विचार होणे आवश्यक आहे.

-सुदेश सावंत

रवींद्र भवनसाठी लवकरच जागेची पाहणी करून पुढील प्रक्रिया सुरू होईल. पेडणे तालुक्यातील कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या सहकार्यातून हे कला भवन उभारण्यात येणार आहे.

-जीत आरोलकर, आमदार मांद्रे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT