Aditya-L1 Mission google image
ब्लॉग

Aditya-L1 Mission: जीवसृष्टीचा पोषणकर्ता सूर्याचे कुतूहल!

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) ‘आदित्य-एल१’ यान शनिवारी सूर्याकडे झेपावले.

दैनिक गोमन्तक

Aditya-L1 Mission: भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) ‘आदित्य-एल१’ यान शनिवारी सूर्याकडे झेपावले. भारताच्या आधी अमेरिका, जपान, चीनसह युरोपने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मोहिमा आखलेल्या होत्या. नासा या अमेरिकेच्या अवकाश संस्थेने पायोनिअर -५’ ही जगातील पहिली सौर मोहीम १९६०मध्ये हाती घेतली होती

पायोनिअर -५’ हे १९९६मधील सौरयान नियोजित ठिकाणापर्यंत पोहचू शकले नाही आणि ही मोहीम अपयशी ठरली ‘नासा’ आणि युरोपीय अवकाश संशोधन संस्थेने (इसा) २००८ मध्ये आयोजित केलेली ‘उलिसेस’ अंशतः यशस्वी ठरली. निरीक्षणाच्या नोंदी पाठविताना ‘उलिसेस स्पेस प्रोब’ या यानाची बॅटरी संपुष्टात आली व त्याचा संपर्क तुटला

‘पार्कर सोलर प्रोब’ चे २०१८ मध्ये प्रक्षेपण

  • ‘पार्कर’ने सूर्याचे अणुरेणू आणि चुंबकीय क्षेत्राची नोंद घेतली

  • ‘नासा’च्या संकेतस्थळानुसार यान सूर्याच्यानजीक जाण्याची ती पहिलीच वेळ होती

  • जपान

  • जपानची अवकाश संशोधन संस्थेकडून (जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन जाक्सा) १९८१ मध्ये हिनोटोरी (ॲस्ट्रो - ए) या देशाच्या पहिल्या सौर निरीक्षण उपग्रह प्रक्षेपण

  • ‘जाक्सा’च्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार कठीण क्ष-किरणांचा वापर करून सौर ज्वाळांचा अभ्यास करणे हा या मोहिमेचा उद्देश

असा आहे सूर्य

  • सूर्य हा पृथ्वीपासूनचा सर्वांत जवळचा तारा

  • सौरमालेतील सर्वांत मोठा घटक

  • सूर्याचे अंदाजे वयोमान ४.५ अब्ज वर्षे इतके आहे

  • त्यास हायड्रोजन आणि हेलियम गॅसचा तप्त गोळा म्हणतात

  • पृथ्वीपासून सूर्याचे अंतर १५० दशलक्ष किलोमीटर आहे

  • तो सौरमालेसाठीचा मोठा ऊर्जेचा स्रोत

  • सूर्यातील गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे सौरमालेतील सर्व घटकांना एकत्र जोडून ठेवता येते

  • त्याच्या केंद्राला ‘कोअर’ म्हणून ओळखले जाते

  • ‘कोअर’चे तापमान कमाल १५ दशलक्ष सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते

  • उच्च तापमानात ‘कोअर’मध्ये न्यूक्लिअर फ्यूजनची प्रक्रिया सुरू होते; यामुळे सूर्याला शक्ती

  • सूर्याच्या दृश्यमान पृष्ठभागाला फोटोस्पिअर म्हणतो

  • हा भाग ‘कोअर’पेक्षा तुलनेने थंड आहे; ज्याचे तापमान ५,५०० सेल्सिअस इतके आहे

अन्य मोहिमा

  1. १९९१ : ‘योकोह’ (सोलर -ए)

  2. १९९५ : सोहो (‘नासा’ व ‘इसा’सह)

  3. १९९८ : ‘ट्रान्सिन्ट रिजन अँड कोरोनल एक्सप्लोरर (ट्रेस) - ‘नासा’च्या मदतीने

  4. २००६ : हिनोड (सोलर -बी) सौर वेधशाळा (अमेरिका आणि ब्रिटनच्या सहकार्याने). सूर्याचा पृथ्वीवरील प्रभावाचा अभ्यास करणे हे उद्दिष्ट

  5. युरोप

  6. युरोपीय अवकाश संशोधन संस्थेने (इसा)

  7. १९९० मध्ये ‘उलिसेस’ मोहीम हाती घेतली

  8. सूर्याच्या ध्रुवाच्या वर आणि खाली असलेल्या भागातील वातावरणाचा अभ्यास करणे हे कारण

  9. अन्य मोहिमा

  10. ऑक्टोबर २००१ : प्रोबा मालिकेतील प्रोबा -२

  11. (‘नासा’, ‘जाक्सा’ व ‘इसा’च्या सहकार्याने)

  12. २०२४ : प्रोबा-३ | २०२५ : स्माईल

  13. ‘नॅशनल स्पेस सायन्स सेंटर’, ‘चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’ (सीएएस) यांच्या वतीने प्रगत अवकाश-आधारित सौर वेधशाळेचे

  14. (एएसओ-एस) ८ ऑक्टोबर २०२२ मध्ये यशस्वी प्रक्षेपण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa News: पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह, हत्येचा संशय; वाचा गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT