गोव्यातील स्थलांतरितांच्या तीन पिढ्यांचा इतिहास: 'स्वप्न सारस्वत' Dainik Gomantak
ब्लॉग

गोव्यातील स्थलांतरितांच्या तीन पिढ्यांचा इतिहास: 'स्वप्न सारस्वत'

गोपाळकृष्ण पै हे कन्नड भाषेतील लोकप्रिय कथाकार.

दैनिक गोमन्तक

प्रश्न: साहित्य अकादमीचा हा पुरस्कार तुम्हाला मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा अनुवाद तुम्हाला का करावासा वाटला

शानभाग: गोपाळकृष्ण पै हे कन्नड भाषेतील लोकप्रिय कथाकार. त्यांनी सिनेमासाठीही पटकथा लिहिल्या आहेत. 'स्वप्न सारस्वत' ही त्यांची पहिलीच कादंबरी. साहित्य अकादमीचा अनुवादाचा प्रकल्प माझ्याकडे येण्यापूर्वी कित्येक वर्षांपूर्वी मी मूळ कन्नड कादंबरी वाचली होती. या कादंबरीला साहित्य अकादमीसह कित्येक प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले होते. ही कादंबरी वाचल्यावर मी भारावून गेले होते. एकदा बस्ती वामन शणै यांच्या जागतिक कोकणी प्रतिष्ठानतर्फे मंगळुरू येथे कोंकणी लेखक व अनुवादक यांची गोलमेज परिषद घडवून आणली होती. तिथे माझी पै यांच्याशी गाठ पडली. त्यावेळी मी त्यांना म्हटलेही, तुमच्या कादंबरीचा मी कोंकणीत अनुवाद करू शकते का? यावर त्यांचा कुतूहलजनक प्रश्न होता, कोंकणीतील कुठल्या शैलीत तुम्ही हा अनुवाद करणार? नंतर हा विषय पुढे गेलाच नाही. पण एकेदिवशी मला साहित्य अकादमीचे पत्र आले. त्यात या पुस्तकाचा अनुवाद करण्याची मागणी होती. माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही.

प्रश्न: या कादंबरीबद्दल काही सांगू शकणार का?

शानबाग: ही कादंबरी स्थलांतरितांच्या तीन पिढ्यांचा इतिहास सांगणारी आहे. 1560 च्या दरम्यान गोव्यातून तिची सुरवात होते. पोर्तुगीजांच्या बाटाबाटीपासून स्वतःला वाचविण्यासाठी मूळ वेर्णा येथील जमीनदार म्हाळ पै गोवा सोडून कर्नाटकाच्या दिशेने कसे पळून जातात. त्यानंतर कासरगोड येथे स्थायिक झाल्यावर दुसऱ्या पिढीचा इतिहास सुरू होतो. त्यानंतर तिसऱ्या पिढीचा संघर्ष अशा रीतीने ही कादंबरी पुढे जाते. ही कादंबरी जरी ऐतिहासिक घटनांवर आधारित असली तरी ती लालित्यपूर्ण भाषेत लिहिली गेली आहे. या कादंबरीत कित्येक प्रथा कशा प्रचलित झाल्या त्याची बारीकसारीक माहिती आहे. त्यात काही काल्पनिक गोष्टीही आहेत. पण पै यांच्या भाषाशैलीमुळे त्या सत्य घटना असाव्यात असेच वाटते.

प्रश्न: कन्नड ते कोकणी हा प्रवास कसा झाला?

शानभाग: जरा अडखळतच! याचे कारण कोकणीच्या अनेक शैली आहेत. पण गोमंतकीय शैली प्रमाणित मानली जाते. त्यामुळे मी हा अनुवाद गोमंतकीय शैलीतून केला आहे. पण मी राहत आहे म्हैसूरमध्ये. तिथे गोमंतकीय शैलीत मजकूर टंकलिखित करून घेणे कठीण काम होते. तरीही मला हिंदी भाषेत टंकलेखन करणाऱ्या प्रिया पै ही कोकणी भाषिक युवती मिळाली. तिने सुमारे 140 पाने टंकलिखित केलीही. मात्र तिला गोमंतकीय शैलीच्या नादशास्त्राची माहिती नसल्याने त्यात अनेक चुका राहिल्या होत्या. त्यामुळे मी गोव्यात दामोदर घाणेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पणजीत माझ्यासाठी टंकलेखकाची सोय करून दिली. माझ्या बहिणीचे घर मीरामार येथे आहे. तिथे मी महिनाभर मुक्काम ठोकला. ही कादंबरी पूर्ण करण्यासाठी राजहंस प्रकाशनचे प्रभाकर भिडे यांचेही सहकार्य लाभले. मात्र हा प्रवास खूप लांबला. खरे सांगायचे झाल्यास मी मध्यंतरी कंटाळूनही गेले होते.

प्रश्न: आता पुरस्कार मिळाल्यानंतर काय वाटते?

शानभाग: निश्चितच केलेल्या श्रमांचे चीज झाले असे वाटते. ही कादंबरी खूप प्रभावी आहे. देशातील सर्व भाषांतील वाचकांपर्यत ती पोहोचण्याची गरज आहे. साहित्य अकादमीच्या माध्यमातून ते साध्य होईल हीच खरी माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT