Biodiversity In Goa Dainik Gomantak
ब्लॉग

Biodiversity In Goa: G-20 प्रतिनिधींना गोव्याच्या जैवविविधतेचे दर्शन

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईनच्या स्नातक कृतिका मल्होत्रा यांचे सहकार्य या सुंदर रचनेसाठी लाभले.

गोमन्तक डिजिटल टीम

Biodiversity in Goa जी-20 परिषदेसाठी गोव्यात येणाऱ्या निरनिराळ्या देशातील प्रतिनिधींना गोव्याच्या समृद्ध परंपरेचे, खाद्य, कला संस्कृतीचे दर्शन फार सुंदर प्रकारे घडवले जात आहे. जुन्या आग्वाद तुुरुंग संकुलात या परिषदेचा एक भाग आयोजित केला गेला होता.

त्यानिमित्ताने तिथे जमलेल्या प्रतिनिधींना गोव्याच्या जैवविविधतेची कलात्मक ओळख घडवण्यात आली. प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ पराग रांगणेकर, ओंकार धारवाडकर आणि पुजा मित्रा यांचे योगदान लाभलेले ‘गोवन मान्सून फॉरेस्ट’ आग्वादमधील या संकुलात उभे राहिले होते.

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईनच्या स्नातक कृतिका मल्होत्रा यांचे सहकार्य या सुंदर रचनेसाठी लाभले. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा भाग असलेल्या पश्‍चिम घाटाचे विहंगमय दर्शन घडवणारा िव्हडीयो तिथे दाखवला जात होता.

तिथला समृद्ध निसर्ग, ओसांडून वाहणारे धबधबे, पक्ष्यांचा चिवचिवाट, जंगलातले आवाज, पावसाचा ध्वनी यातून तिथले वातावरण जंगलमय होऊन गेले हाेते. त्याशिवाय जंगलातील वनस्पतींच्या प्रतिकृतींच्या रचनाही लक्ष वेधून घेत होत्या.

पावसाचे दिवस जवळ आलेले असताना या थिमची योजना करण्याची जी-20 टिमची संकल्पना कल्पक अशीच होती. यासंबंधी माहिती देताना पराग रांगणेकर म्हणाले, ‘राज्याच्या जैवविविधतेशी परदेशी प्रतिनिधींना ओळख करुन देणे हा या रचनेमागचा एक उद्देश होताच शिवाय त्यात एक आकर्षकता देखील होती.’

जैवविधतेच्या दृष्टीने गोवा हा फार महत्वाचा प्रदेश आहे. प्राणी, पक्षी, सरपटणारे जीव, मासे, कोळी, फुलपाखरे, चतूर असे सुमारे 1136 दुर्मिळ आणि धोक्यात असलेले जीव तसेच 1750 प्रजाती गोव्याच्या जैवविविधतेचा भाग आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh-Surya Yuti 2026: वृषभ संक्रांतीला सूर्य आणि बुध ग्रहाची महायुती! 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार महावर्षाव

Kokum Farming: राज्यात कोकम उत्पादनात 40 टक्के घट! फळधारणेला उशीर; हवामान बदलांचा शेतकऱ्यांना फटका

चिता रचली, हंबरडा फुटला.., पण ते होते चित्रपटाचे शूटिंग; साल्वादोर पंचायत क्षेत्रातील घटना, पंचायतीला उशिरा जाग; अनेक जण संभ्रमात

पाकिस्तानी लष्कराच्या तळावर आत्मघाती स्फोट अन् गोळीबाराचा थरार! 15 सैनिकांचा मृत्यू; 'टीटीपी'नं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

Goa weather alert: राज्यात उन्हाचा तडाखा वाढला! रात्रीचा पाराही चढला; पुढील काही दिवस उष्म्यातून सुटका नाही

SCROLL FOR NEXT