Dainik Gomantak celebrates 60th Anniversary
Dainik Gomantak celebrates 60th Anniversary  Dainik Gomantak
ब्लॉग

कर्तव्यनिष्ठा जोपासणारे ‘दैनिक गोमन्तक’!

दैनिक गोमन्तक

‘गोमन्तक’ या दैनिकाला फार मोठी परंपरा आहे. गोमंतकीय समाज जीवनाशी एकरूप झालेले हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. बा. द. सातोस्कर यांच्यापासून आताच्या राजू नायक यांच्यापर्यंत प्रत्येकाने आपापले कर्तव्य निष्ठेने बजावले आहे. काही नावे नमूद करता येतील, ती म्हणजे माधव गडकरी, नारायण आठवले. आणखीही काही आहेत, पण विस्तार किती करणार? कृपया इतरांनी गैरसमज करून घेऊ नये, ही नम्र विनंती.

माझ्या कारकिर्दीमध्ये रायबंदरची होडी दुर्घटना घडली. त्यात 11 माणसांना जलसमाधी मिळाली. त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली. त्यावेळी प्रत्येक कुटुंबाला किमान एकेक हजार रुपये निधी द्यावा, असे ठरविले. त्याकाळी आजच्या इतकी ही रक्कम क्षुल्लक नव्हती. विविध संस्थांकडून, धनिकांच्या मदतीने हे सहज शक्य होते. पण या मदतीला सर्वसामान्यांचा हातभार लागावा असा विचार केला आणि ‘कशी गं वैरीण झाली नदी’ असा अग्रलेख लिहिला आणि त्याद्वारे निधीसाठी आवाहन केले.

बघता बघता अवघ्या चार दिवसांत सुमारे 80 हजारांचा निधी जमा झाला. शाळेतल्या मुलांनी खाऊच्या पैशांतून चार - चार आणे वर्गणी पाठवली. डोळ्यांत पाणी आले. आम्ही भरून पावलो. जुन्या आठवणी निघाल्यावर आजही माझे डोळे पाणावतात. गोव्यावर (Goa) आणि गोमंतकीय माणसावर माझे अतिशय आणि निरपेक्ष प्रेम आहे. विशेष म्हणजे, ज्या ज्या शाळांमार्फत विद्यार्थ्यांचा निधी जमा झाला, त्या सर्व शाळांची आणि विद्यार्थ्यांची नावे दैनिकात दररोज प्रसिद्ध केली. त्यासाठी एक पान राखीव ठेवले होते. दुसरे म्हणजे, पुण्याहून (Pune) गणपतीच्या मूर्ती मागवल्या होत्या. निधीसोबत मूर्ती प्रत्येकाला दिली. त्यामुळे एकूण कार्यक्रमाला भावनिक स्पर्श प्राप्त झाला. रायबंदरला जेथे ही दुर्घटना घडली, तेथील एका शाळेतच हा कार्यक्रम झाला. तेथील नैराश्य दूर करण्याचा तो एक प्रयत्न होता.

- दत्ता सराफ, माजी संपादक, गोमन्तक.

दिग्गज संपादकांची ‘गोमन्तक’वर अमीट छाप!

‘गोमन्तक’ (Gomantak) या दैनिकात दीर्घकाळ काम केल्यामुळे या वृत्तपत्राच्या वाटचालीकडे माझे नेहमीच बारकाईने लक्ष असते. मध्यंतरी या दैनिकाचा जोश थंडावल्यासारखे वाटत होते. मात्र, एक वर्षापूर्वी माझे जुने स्नेही आणि ‘लोकसत्ता’मधील माजी सहकारी राजू नायक यांनी गोमन्तक दैनिकाची सूत्रे हाती घेतली आणि एक नवे चैतन्य दिसू लागले. स्व. बा. द. सातोस्कर, स्व. माधवराव गडकरी, नारायणराव आठवले असे दिग्गज संपादक या दैनिकावर आपली अमीट छाप सोडून गेले आहेत. हे मान्यवर मराठी पत्रकारितेची दैवते आहेत. मी माझ्या परीने तोच वारसा पुढे चालवला. मला समाधान वाटते, की राजू नायक हेही आपल्या पध्दतीने ‘गोमन्तक’ची वाटचाल हे भान ठेवून लोकभावनेचा आदर राखून करीत आहेत. ‘गोमन्तक’ दैनिकाला आणि राजू नायक यांना माझ्या मनापासून शुभेच्छा.

- शरद कारखानीस, माजी संपादक, गोमन्तक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT